
संपादक गफ्फार शेख(मलिक)
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
चाळीसगाव(प्रतिनिधी)- शहरातील इस्लामपुरा भागात राहणाऱ्या मोहम्मद अली या 6 वर्षीय बालकाने दि 2 मार्च रोजी रमजान महिन्याचा पहिला रोजा पूर्ण केला आहे यामुळे त्याचे परिसरात कौतुक केले जात आहे.
शहरातील व्यावसायिक शेख इमाम यांचा मुलगा मोहम्मद अली शेख इमाम या चिमुकल्याने रमजानचा पहिला रोजा (उपवास) पूर्ण केला, त्याचे वय फक्त 6 वर्ष आहे. लहान वयातच रोजा ठेवणे हे त्याच्या धार्मिक शिक्षणाचा आणि आध्यात्मिक जगाकडे झुकाव दर्शवते.
रमजान हा इस्लाम धर्मातील एक पवित्र महिना आहे, ज्यामध्ये मुस्लिम समुदायाचे लोक सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत काही न खात पाण्याचा थेंब देखील न घेता रोजा (उपवास) करतात. हा महिना आत्मशुद्धी, प्रार्थना आणि समुदायाच्या एकात्मतेचा असतो. लहान मुलांना सहसा पूर्ण रोजा ठेवण्याची अपेक्षा केली जात नाही, परंतु त्यांना हळूहळू या धार्मिक सवयीची सवय लावली जाते. मोहम्मद अली शेख इमाम या चिमुकल्याने 6 वर्षाच्या वयात पहिला रोजा पूर्ण केला, हे त्याच्या धार्मिक आणि आध्यात्मिक प्रगतीचे प्रतीक आहे.
त्याच्या कुटुंबियांसाठी हा अत्यंत आनंदाचा क्षण आहे एवढ्या कमी वयात त्याने वाढत असलेल्या उन्हाच्या तडाख्यात पूर्ण केलेल्या या रोजा(उपवास) मुळे त्याचे परिसरात कौतुक होत आहे.