
संपादक गफ्फार शेख(मलिक)
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
चाळीसगाव(प्रतिनिधी)- तालुक्यात अवैध रित्या वाळू वाहतूक व उपसा जोरात सुरू असल्याचे पुन्हा समोर आले आहे.दि 4 मार्च रोजी 3 वाजून 30 मिनिटांच्या सुमारास मेहुणबारे पोलिसांनी अवैध रित्या वाळू वाहतूक करणारे दोन वाळूचे डंपर जप्त करत कारवाई केली आहे.
याबाबत संपूर्ण वृत्त असे की,4 मार्च रोजी दुपारी 3 वाजून 30 मिनिटांच्या सुमारास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण दातरे तसेच सहाय्यक फौजदार शामकांत सोनवणे,पो.हे.कॉ शांताराम पवार,पो. कॉ विक्रम पाटील हे पेट्रोलिंग करत असतांना मेहुणबारे गावाबाहेर जामदा फाट्यावर रहिपुरी कडून दोन नंबर प्लेट नसलेले डंपर येताना दिसल्याने शंका आल्याने गाडीत काय आहे? विचारणा केली असता वाहनचालकांनी वाळू असल्याचे सांगितले.यामुळे रॉयल्टी बाबत विचारले असता रॉयल्टी पावती आढळून न आल्याने दोन्ही डंपर व वाहन चालकांना ताब्यात घेत कारवाई करण्यात आली.दोन्ही डंपर मध्ये प्रत्येकी अडीच ब्रास वाळू मिळून आली आहे.पुढील कारवाई साठी मा.कार्यकारी दंडाधिकारी,तहसीलदार व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना कळविण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण दातरे यांनी दिली आहे.
रहिपुरी येथील ठेक्यावरून वाळू आणल्याचे कळते
हे दोन्ही डंपर अवैध रित्या विना रॉयल्टी रहिपुरी येथील ठेक्यावरून वाळू वाहतूक करत होते.मात्र यावर जे या ठेक्याचे ठेकेदार आहे.त्यांची प्रतिक्रिया किंवा तक्रार पोलिस ठाण्यात आलेली नसल्यामुळे या अवैध वाहतुकीत ठेकेदार हे देखील सहभागी असल्याचा संशय निर्माण होतो.या कारवाई बरोबर त्या ठेक्यावर किती वाळू उपसा झाला आहे? शासकीय नियमांचे पालन होत आहे की नाही? याची देखील चौकशी होणे गरजेचे आहे.
शहरात अवैध गौण खनिज वाहतुकीसाठी विना नंबर प्लेट वाहनांचा उपयोग वाहतूक शाखेचे दुर्लक्ष
शहरातून खाजगी वाहनातून प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांना थांबून जेवढी विचारपूस शहरातील मुख्य चौकांमध्ये केली जाते,तेवढीच विचारपूस अवैध गौण खनिज वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या डंपर वाहनावर जर वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी केली तर नक्कीच अवैध गौण खनिज वाहतुकीला आळा बसेल यात शंका नाही.पण वाहतूक शाखेचे याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसत आहे.