
संपादक गफ्फार शेख(मलिक)
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
चाळीसगाव(प्रतिनिधी)- शहर पोलीस स्टेशन हदीत डीजे, बैंड, मोठ मोठे, सांउड, बार स्पिकर वाजवणा-या वाहनावर दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात.दिनांक ६ मार्च रोजी टाटा मोटर्स अल्ट्रा ९१२ वाहन व डि.जे. बॅण्ड जप्त करत पुढील दंडात्मक कारवाई साठी मा.प्रादेशिक परीवहन अधिकारी यांना कळविल्याने या वाहनावर मा.प्रादेशिक परीवहन अधिकारी कार्यालयाकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
दि ६ मार्च २०२५ रोजी चाळीसगाव शहरातील एम.जे. नगर भागात तेली समाज मंगल कार्यालय येथे टाटा मोटर्स अल्ट्रा ९१२ डि.जे. बॅण्ड वाहन क्रमांक-MH-१५- EG-३७४१ हे मिळुन आले. सदर वाहन हे टाटा मोटर्स कंपनीची अल्ट्रा ९१२ मालवाहू वाहन असुन त्यावर भरपुर प्रमाणात मोठ मोठे सांऊड बार,स्पिकर बसविण्यात आलेले दिसुन येत आहे.सदर वाहनाची प्रथम दर्शनी पाहणी करता त्याच्या मुळ रुपात विना परवानगी बदल केला असल्याचे दिसुन आल्याने सदरचे वाहन ताब्यात घेवुन चाळीसगाव शहर पो. स्टे येथे आणुन मोटार वाहन अधिनियम चे कलम २०७ अन्वये डिटेन करण्यात आले आहे.
सदर वाहन आणुन मोटार वाहन अधिनियम चे कलम २०७ अन्वये डिटेन करुन वाहनावर कार्यवाही होणे बाबत मा.प्रादेशिक परीवहन अधिकारी, प्रादेशिक परीवहन कार्यालय. चाळीसगाव. यांना लेखी पत्रव्यवहार करुन मा. मा. प्रादेशिक परीवहन अधिकारी, प्रादेशिक परीवहन कार्यालय. चाळीसगाव यांनी सदर वाहनावर दंडात्मक कारवाई कार्यवाही करण्यात आलेली आहे.
सदरची कारवाई मा. महेश्वर रेड्डी सो, पोलीस अधिक्षक जळगाव, मा. कविता नेरकर (पवार), अप्पर पोलीस अधिक्षक सो. चाळीसगाव, मा. राजेश चंदेल सो. उपविभागीय पोलीस अधिक्षक चाळीसगाव भाग यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, श्री. किरणकुमार कबाडी सो. यांचे नेतृत्वाखाली करण्यात आली आहे.
सदरची कारवाईत निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या सोबत पोहेकॉ राहूल सोनवणे, पोना महेद्र पाटील,पोकॉ नरेद्र चौधरी, पोकॉ मोहन सुर्यवंशी,पोकॉ गणेश कुवर या पथकाने केली आहे.
चाळीसगाव शहरातील सर्व नागरीकांना विनंती आहे की, आपल्या घरी धार्मिक कार्य, विवाह असे कार्य असतांना सदर कार्यक्रमाकरीता डीजे, अथवा बँड, मोठ मोठे सांउड, बार स्पिकर,शासन नियमांचे उल्लंघन करून वाजवु नये इतर नागरीक यांना त्रास होईल.अशी वागणुक करु नये.तसेच चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन दुरध्वनी क्र. ०२५८९-२२२०७७ तसेच डायल ११२ यावर तात्काळ कळवावे – पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी