संपादक गफ्फार शेख(मलिक)
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
चाळीसगाव(प्रतिनिधी)- इनरव्हील क्लब ऑफ चाळीसगाव यांच्या वतीने गुरुवारी दि 3 एप्रिल रोजी हरिभाऊ चव्हाण शाळा आणि अंध शाळेमध्ये गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफत दंतआरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. या उपक्रमात सुमारे ७० विद्यार्थ्यांनी दंततज्ञांच्या मार्गदर्शनाखाली तपासणी करून घेतली.
डॉ. प्रदीप चव्हाण, डॉ. अजित पवार आणि डॉ. संगीता राजपूत यांनी विद्यार्थ्यांच्या दातांची सविस्तर तपासणी करून त्यांना योग्य आरोग्यसुचना दिल्या. शिवाय, सहभागी विद्यार्थ्यांना मोफत दंतस्वच्छता किट्सचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमात इनरव्हील क्लबच्या अध्यक्ष डॉ. सुनीता पवार, डॉ. नयना चव्हाण, डॉ. रोहिणी सुतावणे, कल्पना धामणे आणि कल्पना महाजन यांनी सक्रिय सहभाग घेतला. डॉक्टर्स आणि संस्थेच्या स्वयंसेवकांच्या समर्पित प्रयत्नांमुळे हे दंतआरोग्य जागरूकता शिबिर यशस्वीपणे पार पडले.
