अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव(प्रतिनिधी) – म.रा.वि.वी. कं. च्या नियमानुसार शैक्षणिक अर्हता आणि अनेक वर्षांचा म.रा.वि.वी. कं मध्ये कामाचा अनुभव असलेले अनुभवी परिपूर्ण कार्यकुशल असलेले बाह्यस्त्रोत कर्मचारी यांना पूर्ववत कामावर हजर करून न घेणाऱ्या तसेच लोकप्रतिनिधी, अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता यांना न जुमानता बेदरकारपणे नियमबाह्य पद्धतीने गैरकारभार करणाऱ्या मे. विद्युत मंडळ माजी अप्रेंटिस सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्था कन्नड या संस्थेला (एजन्सीला) तात्काळ काळ्या यादी (ब्लॅक लिस्ट) मध्ये टाका अशी मागणी निवेदनाद्वारे संभाजी सेनेच्या वतीने दि 8 मे 2025 रोजी मा. कार्यकारी अभियंता म.रा.वि.वि.कं. चाळीसगांव, अधीक्षक अभियंता, म.रा.वि.वि.कं. जळगांव मंडळ यांना कार्यकारी अभियंता चाळीसगांव यांचे मार्फत करण्यात आली असून १८ मे पर्यंत निर्णय न झाल्यास छञपती संभाजी सेना चाळीसगांव महावितरण कंपनीच्या हीरापुर रोडवरील कार्यालया समोरील हीरपुर रोडवर रस्ता रोको आंदोलन करेल, प्रसंगी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास अथवा निर्माण होणाऱ्या कोणत्याही परिस्थितीत सर्वस्वी कार्यकारी अभियंता आधीक्षक अभियंता महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी आणि शासन प्रशासन जबाबदार राहील असा इशारा देण्यात आला आहे.
निवेदनात म्हटले आहे की सदर संस्था ही म.रा.वी.वी.कंपनीस बह्यास्त्रोत कर्मचारी पुरविताना नियमबाह्य पद्धतीचा अवलंब करीत अगदी अधिकाऱ्यांच्या नाकावर टिच्चून कारभार करीत आहे.
याबाबत तसेच चाळीसगांव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी देखील सदर कंपनीला काळ्या यादीत टाकण्यासाठी दिनांक १६ मार्च २०२५ रोजी अधीक्षक अभियंता म.रा.वि.वि.कं. जळगांव मंडळ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिलेले आहे,शिवाय त्या आगोदर देखील १ फेब्रुवारी २०२५ रोजी अधीक्षक अभियंता म.रा.वि.वि.कं. जळगांव मंडळ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्हाधिकारी जळगाव यांना दिलेले आहे, शिवाय दिनांक १ फेब्रुवारी २०२५ रोजीच बाह्यस्त्रोत कर्मचारी भरती प्रकरणी संबधित कर्मचारी पुरवठा धारक संस्थेने केलेले नियमबाह्य कामे आणि भ्रष्टाचार या बाबतची पुराव्यांसह तक्रार आमदार मंगेश चव्हाण यांनी 458/2024-25 अन्वये पोलिस अधिक्षक जळगांव मुख्यमंत्री देवंद्र फडणविस, जिल्हाधिकारी जळगाव आधिक्षक अभियंता जळगांव यांना दिलेली आहे.
तसेच ही संस्था कोणत्याही शर्ती अटींचे पालन करीत नाही या प्रकरणाची चौकशी करून या संस्थेला काळ्या यादीत टाकावे अशी मागणी संभाजी सेनेने केली असून निवेदनाच्या प्रती संबधित वरिष्ठाना पाठवण्यात आल्या आहेत.
निवेदनावर संभाजी सेना संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण शिरसाठ,प्रदेश संघटक सुनील पाटील,उद्योग विकास कामगार संपर्कप्रमुख अविनाश काकडे,तालुका उपाध्यक्ष प्रवीण पाटील ,प्रवक्ता दिवाकर महाले,शहराध्यक्ष आबासाहेब सौंदाणे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
