अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव(प्रतिनिधी)- मुहम्मद शाहदाब अझहर यांनी शिक्षक पर्यायी बौद्धिक चाचणी (टी ए आय टी) परीक्षा २०२५ मध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. राज्यातील तब्बल २,११,३७८ उमेदवारांपैकी ५१ वा क्रमांक आणि उर्दू माध्यमात महाराष्ट्रात द्वितीय क्रमांक मिळवल्याबद्दल त्यांचा इत्तेहाद फाउंडेशन संचालित अस्सलम इंग्लिश स्कूल, चाळीसगाव या शाळेत विशेष सत्कार करण्यात आला.
या सत्कार सोहळ्यास तनवीर शेख (आरपीआय), अफरोज खान, नासिर मणियार हे मान्यवर उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक सय्यद इम्रान सर यांनी त्यांच्या यशाबद्दल गौरवोद्गार काढत सांगितले की, “मुहम्मद शाहदाब यांनी पहिल्याच प्रयत्नात ही परीक्षा उत्तीर्ण केली असून, मुस्लिम उमेदवारांमध्ये दुसरे स्थान मिळवून समाजाचा व शहराचा सन्मान उंचावला आहे.”
आपल्या प्रमुख भाषणात मुहम्मद शाहदाब अझहर म्हणाले की, “हे एक छोटेसे यश आहे. खऱ्या अर्थाने मोठ्या यशासाठी सातत्यपूर्ण संघर्ष आणि ध्येय निश्चय आवश्यक आहे. विद्यार्थी मित्रांनी नेहमी उच्च ध्येय डोळ्यासमोर ठेवून मेहनत घ्यावी आणि स्पर्धात्मक परीक्षांना सज्ज व्हावे.”
या प्रसंगी शाळेचे शिक्षक, कर्मचारी व उपस्थित मान्यवरांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. कार्यक्रमाचे आयोजन मोहसीन खान यांनी केले होते. शाळेतील समर्पित कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेत समारंभ यशस्वी केला.
