अधिकार आमचा न्युज नेटवर्क
जळगाव प्रतिनिधी शाहिद खान
जळगाव (प्रतिनिधी)- श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात इको क्लब तर्फे “पर्यावरणपूरक गणपती” या उपक्रमाअंतर्गत विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक गणेश मूर्ती तयार केल्या.
विशेष म्हणजे या मूर्तींमध्ये विविध झाडांची बियाणी टाकण्यात आली असून मूर्तींचे विसर्जन घरीच कुंडीत करण्यात येणार आहे. यामुळे मूर्तीतील मातीचा उपयोग झाडांच्या वाढीसाठी होणार असून मूर्तीतील बीजांपासून नवीन रोप तयार होणार आहे.
या अनोख्या उपक्रमामुळे “गणेशोत्सव साजरा करतानाच निसर्ग संवर्धनाला हातभार” लावण्याची संकल्पना विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याचा प्रयत्न होत आहे. शाळेतील इको क्लबचे सदस्य यंदा या संकल्पनेची अंमलबजावणी करणार असल्याचे मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी सांगितले.
