अधिकार आमचा न्युज नेटवर्क
जळगाव प्रतिनिधी शाहिद खान
जळगाव (प्रतिनिधी) – श्री संत ज्ञानेश्वर पाटील माध्यमिक विद्यालयात स्वस्त नारी सशक्त भारत अभियानांतर्गत किशोरवयीन मुलींसाठी आरोग्यविषयक समुपदेशन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात इयत्ता आठवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थिनींना डॉक्टर श्रीमती अमिता श्रीवास्तव यांनी मार्गदर्शन केले.
डॉ. श्रीवास्तव यांनी विद्यार्थिनींना त्वचेचे विकार, मासिक पाळीतील समस्या, व्यसनाधीनता, हिंसा, वर्तणुकीतील बदल, आत्महत्येच्या प्रवृत्ती आदी महत्त्वाच्या विषयांवर माहिती दिली. तसेच किशोरवयीन आरोग्याशी संबंधित गैरसमज दूर करून योग्य ती काळजी घेण्याचे मार्गदर्शन केले. किशोरवयीन मुलींसाठी कार्यरत हेल्पलाईन क्रमांक १८०० २३३ २६८८ याचीही माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शितल कोळी मॅडम यांनी केले. डॉक्टर श्रीमती अमिता श्रीवास्तव यांचे स्वागत उज्वला नन्नवरे मॅडम यांनी पुष्पगुच्छ देऊन केले. या वेळी विद्यालयातील सर्व महिला शिक्षिका उपस्थित होत्या.
