अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव(प्रतिनिधी): राष्ट्रीय एकता दिवसाच्या औचित्याने चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनतर्फे बुधवार, दि. ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी ‘रन फॉर युनिटी’ मॅरेथॉनचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय ऐक्य, बंधुता व एकात्मतेचा संदेश जनमानसात पोहोचावा, तसेच युवकांमध्ये फिटनेसबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने ही मॅरेथॉन आयोजित करण्यात आली आहे.
मॅरेथॉनची सुरुवात सकाळी ५.०० वाजता महाराणा प्रताप चौक, चाळीसगाव येथून होणार आहे. एकूण ५ किमी अंतराच्या या स्पर्धेचा मार्ग महाराणा प्रताप चौक – मालेगाव बायपास यू-टर्न – महाराणा प्रताप चौक असा असेल.
ही स्पर्धा पुरुष आणि महिला अशा दोन गटांमध्ये घेतली जाणार असून विजेत्यांसाठी आकर्षक पारितोषिकांची तरतूद करण्यात आली आहे.
बक्षीस तपशील :
🏅 प्रथम पारितोषिक : ₹५,००० + प्रमाणपत्र/मेडल
🥈 द्वितीय पारितोषिक : ₹३,००० + प्रमाणपत्र/मेडल
🥉 तृतीय पारितोषिक : ₹१,००० + प्रमाणपत्र/मेडल
याशिवाय, स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांना विशेष टी-शर्ट देण्यात येणार आहेत.
चाळीसगाव शहर पोलीस प्रशासनाने शहरातील युवक, महिलांसह सर्व नागरिकांना या उपक्रमात उत्साहाने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
स्पर्धा स्थळ व वेळ
दिनांक : ३१ ऑक्टोबर २०२५
वेळ : सकाळी ५.०० वाजता
स्थळ : महाराणा प्रताप चौक, चाळीसगाव
नाव नोंदणी साठी खालील लिंक वर जाऊन माहिती भरा
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdHBWUX6T7083kYBeOcM2M-1yATpamSEuG0ohGzCOhKRLJ2GA/viewform?usp=dialog
• भगवान रामचंद्र पाटील – ९५११८ ९२७२७
• दत्तात्रय हरीश्चंद्र पाटील – ९६०४९ ३२६७६
— चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन
