अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
पक्षाच्या आदेशामुळे नगराध्यक्ष म्हणून प्रतिभाताई चव्हाण यांना नगराध्यक्ष पदाची संधी मिळाली असून आमदार मंगेश चव्हाण यांनी आपल्या इतर दोन सहकाऱ्यांचे नावे नगराध्यक्ष पदासाठी पक्षाकडे दिली होती, आमदार चव्हाण यांना घरात तिकीट नको होते मात्र प्रतिभाताई चव्हाण यांचे सामजिक कार्य तसेच पक्षाने केलेल्या सर्वेत त्यांना मिळालेले ९८ % जनतेचा, पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा पाठिंबा यामुळे पक्ष श्रेष्ठींनी त्यांच्या नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी देत शहराच्या विकासाची संधी दिली आहे – राधेश्याम चौधरी (जिल्हाध्यक्ष भाजपा जळगाव)
चाळीसगाव (प्रतिनिधी):चाळीसगाव शहरातील नगरपालिका निवडणुकीत यंदा मोठा राजकीय बदल पाहायला मिळत आहे. आमदार मंगेश चव्हाण यांनी मुरब्बी नगरसेवकांना “आराम” देत पक्षात नवचैतन्य फुंकण्याचा निर्णय घेतला असून नवतरुणांच्या हातात नेतृत्वाची सूत्रे सोपवली आहेत.
भाजपाकडून यंदाच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदापासून ते नगरसेवक पदापर्यंत बहुतेक सर्व चेहरे नवखे असल्याचे दिसून आले. तरुण नेतृत्व, नव्या विचारांची जोड आणि स्वच्छ प्रशासनाचा संदेश देत पक्षाने पूर्णपणे ‘नवीन टीम’ मैदानात उतरवली आहे.
या निर्णयामुळे शहरात राजकीय चर्चांना जोर आला असून, वारंवार निवडून येणाऱ्या काही अनुभवी नगरसेवकांना यावेळी तिकीट न मिळाल्याने भाजपाने संघटनेत ‘बदल आणि तरुण शक्ती’ला प्राधान्य दिल्याचे स्पष्ट झाले आहे.
नव्या उमेदवारांमुळे शहरवासीयांमध्ये उत्सुकता वाढली असून, चाळीसगाव नगरपालिकेत यंदा ताज्या नेतृत्वाची नवी झळाळी पहायला मिळणार असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.