अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव(प्रतिनिधी)- नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी एकूण १०० मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली असून, त्या केंद्रांवर वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएम (EVM) मशिन्सची सेटिंग व सिलिंग प्रक्रिया दि. २८ नोव्हेंबर २०२५ रोजी नवीन प्रशासकीय इमारत, धुळे रोड, तहसील कार्यालय, चाळीसगाव येथील सभागृहात यशस्वीरीत्या पार पडली.
सदर प्रक्रियेदरम्यान उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत ईव्हीएम मशिन्सच्या कार्यपद्धतीची माहिती देण्यात आली. त्यानंतर पारदर्शकतेने सेटिंग व सिलिंगची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. निवडणूक व्यवस्थेनुसार ५० मतदान केंद्रावर ५० बॅलेट युनिट (BU) व ५० मतदान केंद्रांसाठी १०० बॅलेट युनिट् लागणार आहे.
राखीव मशिन्ससह एकूण ११० कंट्रोल युनिट्स (CU) व १७७ बॅलेट युनिट्स (BU) तयार ठेवण्यात आल्या असून, या संपूर्ण प्रक्रियेसाठी १८ टीम कार्यरत होत्या.
या वेळी निवडणूक निरीक्षक मा. श्री. देवदत्त केकान, अप्पर जिल्हाधिकारी, मालेगाव यांनी या प्रक्रियेची पाहणी करून कर्मचाऱ्यांना आवश्यक मार्गदर्शन केले तसेच उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला.
यावेळी मा. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी श्री. प्रमोद हिले, तहसीलदार श्री. प्रशांत पाटील व सहा. निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी श्री. सौरभ जोशी हे उपस्थित होते.
