मराठा समाजाबद्दल अपशब्द वापरणारे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचा चाळीसगाव येथे समस्त मराठा बांधवांच्या वतीने निषेध

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार मलिक(शेख)
चाळीसगाव(प्रतिनिधी) – भाजप शिंदे शिवसेना सरकारमधील आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी बीडमध्ये एका जाहीर कार्यक्रमात मराठा आरक्षणाबाबत ‘आम्ही सत्तेत आल्यानंतरच मराठा आरक्षणाची खाज काहींना सुटते”. असे बेताल वक्तव्य केल्याचा चाळीसगाव येथे समस्त मराठा बांधवांच्या वतीने मंत्री तानाजी सावंत यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात येउन तात्काळ राजीनामा घ्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री,महाराष्ट्र राज्य यांना करण्यात आली असून दि २६ रोजी तहसीलदार चाळीसगाव यांना निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की मराठा समाजाची आर्थिक व शैक्षणिक परिस्थिती मागासलेली आहे असे सर्वच शासकीय समित्यांतील अहवाल स्पष्ट करत आहेत. त्यासोबतच ग्रामीण व शहरी भागातील बहुसंख्य मराठा तरुण हा बेरोजगार आहे याची कल्पना आपल्याला आहे. खासदार युवराज छत्रपती संभाजी यांच्या आंदोलनाच्या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिष्टमंडळाचे प्रमुख होतात व आपण मराठा आरक्षणाच्या बाबत योग्य ती पावले उचलू असे आश्वासित केलेले होते.
मात्र आपल्याच गटातील व आपल्या सरकारमधील आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी बीडमध्ये एका जाहीर कार्यक्रमात मराठा आरक्षणाबाबत ‘आम्ही सत्तेत आल्यानंतरच मराठा आरक्षणाची खाज काहींना सुटते”. हे अत्यंत चुकीचे विधान केले हे वक्तव्य अत्यंत चुकीचे व गरीब मराठा युवकांना व मराठा आरक्षणाच्या मागणीला खुजी दाखवण्याचा प्रकार आहे. शिवाय तानाजी सावंत यांनी ‘मी मराठा आहे’ असे म्हटले असले तरी आम्ही अशा सरंजामदार मराठ्यांना आमचा नेता मानत नाही. यांच्या शिक्षण संस्था, यांची कारखाने हे फक्त यांनी त्यांची तुंबडी भरण्यासाठी मोठी केलीत मात्र सामान्य मराठा रस्त्यावर सोडला. मंत्री सावंत यांनी बेताल वक्तव्य केले असे वक्तव्य करणाऱ्या कोणत्याही राजकीय पक्ष संघटना किंवा मंत्री यांनी निवडणुकी काळात छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो ही वापरू नये किंवा प्रचारात शिवाजी महाराजांचे नावही घेऊ नये जर असे आढळल्यास मराठा समाज गप्प बसणार नाही आणि मराठा समाजाबद्दल वक्तव्य करणारे असे मंत्री व त्या पक्षाचा नेत्याच्या तोंडाला काळे फासल्या शिवाय राहणार नाही. असा इशारा देण्यात आला आहे
तानाजी सावंत यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी आणि चाळीसगाव सकल मराठा बांधवांच्या वतीने करण्यात आली आहे. आंदोलनात गणेश पवार ,अरुण पाटील,पप्पू पाटील,खुशाल बिडे,मुकुंद पाटील, मुकुंद पवार ,ज्ञानेश्वर कोल्हे ,अरुण अजबे, प्रफुल्ल देशमुख, छोटू अहिरे, संजय कापसे, दीपक देशमुख, अमोल पाटील ,भाऊसाहेब पाटील, सुनील पवार, राहुल सुर्वे , नामदेव तुपे, राजेंद्र पगार, भरत नवले ,गोकुळ पाटील,किशोरस्वार सहभागी झाले होते,