आम्ही तुमच्यासाठी बाहेर आहोत तुम्ही परिवारासाठी घरात रहा-दौंड शहर पोलीस निरीक्षकांचे भावनिक आव्हान
सर्व दौंड करांसाठी आव्हान
गेले वीस-पंचवीस दिवस आपण डाऊन मध्ये आहोत दौंडकर यांनी केलेल्या सहकार्यामुळे दौंडमध्ये कोरोना दाखल होऊ शकलेला नाही आता परदेशातून लागण झालेल्या लोकांकडून कोरोना पसरण्याचे दिवस संपलेले आहे
आता जर कोरोना ची लागण झाली तर ती केवळ आपल्या हलगर्जीपणामुळे होऊ शकते लोक अनेक ठिकाणी गटागटाने बसलेले दिसून येतात गटागटाने चालण्यासाठी जातात आपण जर गटागटाने बसलो तर आपला एकमेकांशी संपर्कात येणार आहे त्यामुळे कोरोना प्रसारासाठी एक पूल तयार होणार आहे त्यामुळे आपण कृपया कुठल्याही गटागटाने बसू नका कुठल्याही सामुहिक कार्यक्रमात समाविष्ट होऊ नका त्यामुळे आपल्या घरातील महिला पुरुष वृद्ध या लोकांना यापासून धोका होऊ शकतो त्यामुळे कृपया नियम पाळा आणि आम्ही तुमच्या रक्षणासाठी घराबाहेर आहोत तुम्ही परिवारासाठी घरात रहा आपल्या फॅमिलीला आपल्या आजूबाजूला मित्रपरिवाराला सांभाळा तुमच्या भल्यासाठी आम्ही कठोर निर्णय घेणार आणि पोलीस प्रशासन तर कारवाई करणारच कोणालाही सोडणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी.
घरी रहा सुरक्षित रहा
पोलीस निरीक्षक
दौंड पोलीस स्टेशन