अवघ्या 1 तास 21 मिनिटात मुद्देमाल सह सोन चोरणाऱ्या टोळीला अटक, शहर पोलिसांची कारवाई….

संपादक गफ्फार शेख
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
शहर पोलिसांनी काही वेळातच तपास चक्र फिरवत सी सी टीव्ही च्या आधारे व ताब्यात असलेल्या आरोपींची चौकशी करून फरार आरोपीस बांगडया सहित अटक केल्यामुळे व सोनं परत मिळाल्याने राजू पंजाबी, जुबेर शेख, समीर पंजाबी, वाकर पहलवान, तनवीर शेख, वसीम पठान,अख़लाक़ खान आदींनी शहर पोलीस प्रशासनाचा सत्कार करत आभार व्यक्त केले.
चाळीसगाव(प्रतिनिधी)-शहरातील सराफ बाजारातून 43 ग्रँम वजनाच्या सोन्याच्या बांगड्या चोरुन नेणाऱ्या महिलांच्या टोळीला मुद्देमालासह दिनांक 11 एप्रिल रोजी 1 तास 21 मिनिटात अटक.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, फिर्यादी अफसाना जहिरोद्दीन पंजाबी वय 55 वर्षे रा. मदिना मशिद जवळ, हुडको कॉलनी, चाळीसगांव यांनी सायरचंद मोतीलाल ज्वेलर्स यांच्या दुकानातुन 2 लाख 40 हजार रुपये किमतीच्या 43 ग्रँम वजनाच्या 4 सोन्याच्या बांगड्या खरेदी करुन त्यांच्या मुलीसह घरी जात असतांना 4 अनोळखी महीलांनी त्यांना जुनी नगर पालीका गेट जवळ घेराव घालुन त्यांच्या पर्स मध्ये ठेवलेल्या सोन्याच्या बांगड्या चोरी केल्याचे लक्षात येताच त्यांनी लागलीच आरडा-ओरड केल्याने आजुबाजुच्या नागरीकांनी तीन महिलांना जागीच पकडुन ठेवले. त्यांच्यातील एक महिला सोन्याच्या चारही बांगड्या घेवुन पसार झाली होती. पोलीसांना माहीती मिळताच महिला नामे 1) राणी दिपक राक्षे वय 30 वर्षे, 2) आशाबाई गणेश कांबळे वय 40 वर्षे, 3) सुलोचना अर्जुन सकट वय 45 वर्षे सर्व रा.चंदनपुरी ता. मालेगांव जि. नाशिक यांना ताब्यात घेवुन त्यांच्याकडे गुन्ह्याबाबत अधिक चौकशी केली असता पळुन गेलेली महिला नामे 4) अनिता दिनु फाजगे रा. चंदनपुरी ता. मालेगांव असे असल्याची माहीती प्राप्त झाली. फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारी वरुन चाळीसगांव शहर पो.स्टे. वर नमुद महिलांविरुध्द गुन्हा दाखल केला असून
मा. पोलीस अधिक्षक सो. श्री एम. राज कुमार यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे, मा. अपर पोलीस अधिक्षक सो. श्री रमेश चोपडे व मा. सहा. पोलीस अधिक्षक सो. श्री अभयसिंह देशमुख यांनी दिलेल्या सुचनाप्रमाणे,पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली पळुन गेलली महिला अनिता दिनु फाजगे हिचा शोध घेणेकामी पोलीस पथकातील अंमलदार पोहेकॉ योगेश बेलदार, पोना राहुल सोनवणे, पोना दिपक पाटील, पोना भूषण पाटील, पोकॉ निलेश पाटील, पोकॉ प्रवीण जाधव, पोकॉ अमोल भोसले, पोकॉ समाधान पाटील, पोकॉ सबा शेख अशांना रवाना केले असता त्यांनी नमुद महिलेचा शोध घेवुन तिला चोरीस गेलेल्या मुद्देमालासह ताब्यात घेवुन पोलीस स्टेशनला हजर केलेले आहे.
नमुद महिलांविरुध्द चाळीसगांव शहर पो.स्टे. गुरनं. 144/2023 भादवि कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल असुन सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकॉ योगेश बेलदार नेम. चाळीसगांव शहर पो.स्टे. हे करीत आहेत.