अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार मलिक(शेख)
चाळीसगांव(प्रतिनिधी)- प्रभाग क्र .10 मधून एम . आय . डी . सी . येथील गुजरात अंबुजा कंपनी रेल्वे स्टेशन जवळील मालधक्क्या वरुन ते खडकी एम.आय.डी.सी. वाहतूक करीत आहे यामुळे प्रभागात अनेक समस्या निर्माण होत असून त्वरित वाहतूक बंद करावी व नगरपालिका प्रशासनाचे होणारे नुकसान व नागरिकांना होणारा मनस्ताप थांबवावा असे निवेदन दि 15 जुलै रोजी माजी नगरसेवक चिरागोदीन शेख यांनी नगरपालिका प्रशासनास व शहर पोलीस वाहतूक शाखा यांना दिले.
रेल्वे स्टेशन जवळील मालधक्क्या वरुन ते खडकी एम.आय.डी.सी. पर्यंत ट्रकांनी वाहतूक करीत आहे यामुळे वार्ड क्रमांक 10 या प्रभागातील लोकांच्या अनेक तक्रारी वाढलेल्या आहेत . कारण की , मालधक्क्या जवळ चौफुली रस्ता व जवळच वसाहत असल्यामुळे नेहमीच येथे छोट्या वाहनांची वर्दळ असते मात्र या अवजड वाहनांमुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वेळोवेळी ट्रॉफीक जाम होत असतो तसेच या अवजड वाहनांमुळे प्रभागातील रस्ते खराब होतात आणि पाण्याची पाईप लाईन वारंवार फुटत आहे,तरी सदर वाहने ही ओव्हरलोड भरलेली असतात आणि त्यांचा स्पीड देखील जास्त असतो .तरी गुजरात अंबुजा या कंपनीच्या मक्का वाहतुकीवर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी , असे न केल्यास आपल्याकडे नगरपरिषद चाळीसगांव येथे मोर्चा घेवून येवू व आमरण उपोषण करु , होणाऱ्या परिणामास आपण स्वतः जबाबदार रहाल असा इशारा निवेदनद्वारे नगरपालिका प्रशासनास व शहर पोलीस वाहतूक शाखा यांना देण्यात आला आहे यावेळी माजी नगरसेवक चिरागोदीन शेख यांच्यासह वार्डातील नागरिक उपस्थित होते.