अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी गफ्फार शाह
चाळीसगाव – तालुक्यात गेल्या दोन ते तीन वर्षापासून वाळूची मोठ्या प्रमाणावर चोरी केली जात असून अवैधरित्या चोरी केलेल्या वाळूने नदीचे उत्खनन होत आहे. शासनाची कोणत्याही प्रकारची परवानगी नसतांना चोरांचे वाळूचोरीचे प्रकार सर्वत्र चर्चेत असतांना शासन मात्र मूग गिळून गप्प आहे या आशयाची तहसिलदारांकरवी कोणत्याही प्रकारची दंडात्मक कारवाई का केली जात नाही ? सदर वाळूचोरी करणाऱ्यांना पाठीशी का घातले जाते ? याबाबत आज तालुका महाविकास आघाडीच्या वतीने प्रशासनास जाब विचारण्यात आला यावेळी तहसिलदार अमोल मोरे यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले.या प्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष दिनेश पाटील, शहराध्यक्ष शाम देशमुख, भगवान पाटील, भारतीय कॉंग्रेस पक्षाचे रमेश चौधरी, प्रदीप देशमुख, देवेंद्र पाटील, रमेश शिंपी, शिवसेनेचे नेते महेंद्र पाटील, भिमराव खलाणे, आकाश पाटील, प्रकाश पाटील, गुंजन मोटे,चंद्रकांत महाजन, लवेश राजपूत आदी पदाधिकारी उपस्थित होते.
