Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

आणि …! वाल्हेकरवाडी पोरकि झाली

0
4 0
Read Time12 Minute, 42 Second

प्रतिनिधी सनी घावरी

” अल्पकाळातील राजकीय कारकिर्दीत ही जन-मनात दीर्घकाल आपल्या कार्याचा अमिट ठसा उमटविणारे वै. तानाजी (भाऊ) शंकर वाल्हेकर (मा.विरोधी पक्षनेते)

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या १९८६ मधील सार्वत्रिक
निवडणूकित, आपल्या कुटुंबात कोणतीही राजकिय पार्श्वभूमी नसतांना, वाल्हेकरवाडी वॉर्डा मधून एक युवक वयाच्या अवघ्या बाविस व्या वर्षी निवडणुकिस सामोरा गेला. कोणत्याही राजकिय पक्ष्याचे पाठबळ नाही परंतु जनशक्ती मात्र सोबत होती. तरी ही यश दोन हात दूर राहिले त्यो युवक म्हणजे तानाजीभाऊ

पण…..ते पराजयाने खचणारे नव्हते, म्हणूनच १९९२ च्या म. न. पा. निवडणुकीला पुन्हा सामोरे गेले परंतु याही वेळी प्रयत्न तोकडे पडले.

ज्याच्या नावातच ‘ तानाजी ‘ होता. मग जिद्द,
प्रयत्न व चिकाटी अर्थात त्यांच्या रक्तात होती. म्हणूनच १९९७ सालि सार्वत्रिक निवडणुकीत राजकीय पक्षांकडे उमेदवारी मागितली परंतु त्यास उमेदवारी नाकारण्यात आली. पण हा गडी निराश नाही झाला. त्यांना त्यांच्या वाडीतील जनतेवर विश्वास होता. सोबत संघटन कौशल्य होते. आणि त्यानी पुन्हा ‘अपक्ष’ उमेदवारी अर्ज भरला व तिसऱ्या प्रयत्नांत यश प्राप्त करीत आपल्या जिद्दीचे दर्शन घडविले.

भाऊंनी आपल्या विजयाचे श्रेय परिसरातील जनतेला दिले कारण जनशक्ती हेच त्यांचे बलस्थान होते.

भाऊंनी परिसर विकासाचे आराखडे तयार केले. त्यासाठी त्यांनी सर्व अपक्षांची मोट बांधत महापालिकेत स्वतंत्र गट निर्माण केला. त्यांना स्थायी समिती सदस्य पद मिळाले व तेथूनच वाल्हेकरवाडी चिंचवडे नगर रावेत परिसराच्या”
विकासपर्वाला सुरुवात झाली.

वाल्हेकरवाडी, बळवंतनगर, चिंचवडे नगर, गुरुव्दारा बिजलीनगर प्रेमलोक पार्क रावेत या भागाचा विकास करण्याचे शिवधनुष्य समोर होते. पण — भाऊ मागे नाही सरले त्यांनी सर्व प्रथम नागरिकांच्या दैनदिन गरजा लक्षात घेत पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन टाकून घेत पाण्याची समस्या सोडविली. त्याच बरोबर निवासी क्षेत्रातील सांडपाणी निचर्या साठी ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम केले. तर, डी. पी. प्लॅन प्रमाणे रस्ते निर्माण करून तेथे डाबंरीकरण केले त्यामुळे जेथे पायी चालणे अशक्य होते. ते सुसज्ज रस्ते केल्याने नागरिकांचे चेहयावर स्मित हास्य दिले. रात्री अपरात्री कामावर अथवा घरी जाणाऱ्या औधोगिक कामगारांना अंधाराची समस्या होती म्हणून योग्य तेथे पथदिवे बसविले तर नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत वॉर्डातील स्वच्छते बाबत जागरुक राहिले त्यामुळे अल्पवधीत वॉर्डचे स्वरूप बदलले.

भाऊंनी सार्वजनिक कामासह महापालिकेच्या व्यक्तीगत कामात लक्ष देताना महापालिकेच्या विविध योजना घरा-घरात पोहचवून त्याचा लाभ मिळवून दिला. त्याच बरोबर शिक्षणापासून कोणी वंचित राहू नये म्हणून शाळा-महाविद्यालयात अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवून दिला. तर गोर-गरीब गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तुंचे ही वाटप केले. त्याच बरोबर बेरोजगार तरुणांची व्यथा पाहून महाराष्ट्र शासनाच्या योजने अंतर्गत बँक ऑफ महाराष्ट्राच्या विशेष सहकार्याने उद्योग व्यवसायासाठी अत्यल्प दराने कर्ज उपलब्ध करून दिले. एवढेच नव्हे तर भाऊंनी आपल्या स्वनिर्मित
प्रगति नागरि सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून अनेक गरजवंताना कर्जरुपी अर्थसहाध्य देत त्यांना अर्थिक सक्षम बनविष्यासाठी सहकार्य केले. त्यामुळे जनतेच्या हृदयात प्रेमाचे स्थान निर्माण झाले.
वाल्हेकरवाडी तील ग्रामस्थां मध्ये आपल्या कर्तुत्ववाने एक आगळ वेगळे स्थान निर्माण केले वाल्हेकरवाडी परिसरातील कोणत्या हि प्रकारचे कार्य असो व
वादविवाद असो व इतर काही समस्या असल्यास भाऊंचा हा शब्द हा अंतिम मानीत असे . प्रत्येक घराघरा मध्ये त्याचे एक आदरयुक्त नाते संबंध होते

भाऊंनी महापालिकेत स्थायी समिती
सदस्य म्हणून सलग चार वर्षे तर एक वर्षे विरोधी पक्षनेता म्हणून कार्यरत राहताना त्यांनी शहर विकासासाठी जेथे योग्य तेथे सहकार्याची ठाम भूमिका घेतली तर जेथे आयोग्य तेथे कडवा विरोध दर्शविला कारण महापालिकेची तिजोरी ही शहराच्या विकासासाठी आहे त्याचा योग्य विनियोग झाला पाहिजे शक्य तेथे पैसा बचत झाला पाहिजे असा त्यांचा आग्रह असे.

त्याचेच उदाहरण म्हणजे भाऊंनी यांच्या दूरदृष्टीकोनातून महापालिकेच्या वीज बिलावर होणारा खर्च कमि करण्यासाठी सुझलाँन’ कंपनीच्या माध्यमातून सातारा चाळकेवाडी येथे पवनचक्की द्वारे वीज निर्मिती प्रक्ल्प उभारण्याचा प्रस्ताव मांडला यासाठी अभ्यास दौरा सुध्दा आयोजित केला. हा प्रकल्प यशस्वी झाला असता तर महापालिकेचे कोटयावधी रुपये वाचाले असते. पण तेथे राजकारण आडवे आले.
स.न. १९९७ ते २००२ हा पाच वर्षाचा काळ वाल्हेकर वाडी
रावेत बिजलिनगर चिंचवडेनगर प्रेमलोकपार्क बाळवंतनगर शिवनगरी गुरुद्वार व चिंतामणी मंदिराचा आजूबाजू चा सर्व परिसरातील नागरिकांना हा पाच वर्षाचा सुवर्ण काळ अनुभवयास मिळाला
भाऊंनी वयाचा १६ व्या वर्षा पासून कुटुंबाची जबाबदारी स्वीकारून कामाला सुरवात केली त्यानंतर बजाज ऑटो कारखान्यात १४ ते १५ वर्ष नोकरी केली. परंतु सेवक होण्यापेक्षा मालक होण्याकडे त्यांचा कल असल्याने त्यांनी स्वतःची वीट भट्टी सुरु केली तर त्याच बरोबर ‘स्टोन क्रेशर व्यवसाय सुरू करून अनेक अशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देत त्यांचा
रोजीरोटीचा प्रश्न मिटवला .

त्यांचे सांप्रदायिक मन स्वस्थ बसून देत नव्हते पांडुरंग भक्तीकडे त्यांचा ओढा होता म्हणूनच त्यांनी विठ्ठल तरुण मंडळ व ग्रामस्थांच्या सहकार्याने विठ्ठल मंदिरात कार्तिकी काकड आरती, कीर्तन सप्ताह, मंदिराचा वर्धापनदिन, आषाढी वारी निमित्त वारकरयांना अन्न दान, गणपती उत्सव, नवरात्र उत्सव असे विविध धार्मिक कार्यक्रम राबवित . किर्तना मध्ये दंग होताना स्व:ता मृदुंग वादन करीत पेटी वर स्व:ता भजन गात असत.
तर सामाजिक बांधिलकी मधून विविध स्पर्धांचे आयोजन करून रोख पारितोषिक देवून तरुणाईचा उत्साह वाढविला,समजा बद्दल असलेल्या तळमळीतुन ते नेहमी बालश्रम, वृद्धश्रम येथे नेहमी अन्न दान आणि धनधन्य वाटप करत होते. तर 2020 मध्ये कविड १९ या महामारीमुळे लॉक-डाऊन कालात वयाच्या ६२ व्या वर्षीही ते स्वस्थ बसले नाही त्यांची समाजाबद्दल असलेली आस्था कधीही कमी झाली नाही त्यांनी लॉक डाउन च्या काळात गरजुना अन्न धन्य आणि मास्क सॅनिटाइजर संपूर्ण काळांत पुर्वत राहिले

भाऊंची इच्छा असायची सर्व ग्रामस्थांना सोबत घेऊन धार्मिक सामाजिक कामं करण्यांची होती त्यातुनच त्यानी विठ्ठल रुक्मिणी मंदिरा च्या जीर्णोद्धारच्या वेळी सर्व
ग्रामस्थांना एकत्रित करून राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजित दादा पवार यांच्या हस्ते भूमिपूजन केले होते .

भाऊंनी सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करत असताना त्यांनी कधीही स्वतःच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष केले नाही त्यांची तिन्ही मुले उच्चशिक्षित केली त्यांचा कुटुंबात त्यांची पत्नी
श्रीमती शोभाताई मुले धनंजय व सुरज आणि विवाहित कन्या प्रियांका काळोखे आहेत.
त्याचे चिरंजीव श्री धनंजय व त्यांच्या पत्नी सौ प्रियांका असे असुन भाऊंचा सामाजिक वारसा धनंजय पुढे नेत असून त्यांना त्यांचे बंधू सुरज यांची साथ लाभत आहे

आजमात्र या कुटुंबावर दि. १६ एप्रिल रोजी दुःखाचा डोंगर कोसळला व त्यांच्या अकस्मित निधनाने त्यांच्या कुटुंबियासह त्यांचा सासरचा आकुर्डी येथील काळभोर परिवार जावई संदीप काळोखे (उदयोजक) आणि संपूर्ण शहारामध्ये शोककळा पसरली आहे.वाल्हेकरवाडी परिसरातील नागरिकांचा आधारवड गेल्याची भावना निर्माण झाली आहे .

जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या अभंगांत
उल्लेख आहे की,……
आयुष्याच्या साधनें । सचिदानंद पदवी घेणे
तुका म्हणे पावरणीं | करू स्वर्गाची निशाणी
भावार्थ: देहाचा आयुष्यभर साधन म्हणून वापर करून परब्रम्हरवरूप अव्दैत व्हावे. अर्थात सत्चिदानंद पदविस पोचावे

या अंभगाच्या चरणा प्रमाणे आज वै. तानाजी भाऊ वाल्हेकर यांनी समाजासाठी देह झीझवून आज स्वर्गवासी झाले
आणि…….त्यांच्या जाण्याने वाल्हेकरवाडी पोरकी
झाल्याचे मत व्यक्त करून त्यांच्या मित्र परिवारमध्ये हळहळ व्यक्त होत आहे

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: