आण्णा भाऊ साठे यांच्या स्मृतिदिनी घडवा संवेदनशीलता मनी

0 0
Read Time2 Minute, 9 Second


अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

संपादक गफ्फार मलिक(शेख)

जळगाव – आण्णा भाऊ साठे यांच्या स्मृतिदिनी घडवा संवेदनशीलता मनी,असा सूर आयोजित चर्चा सत्रातून व्यक्त झाला.
चर्चासत्र जळगाव जिल्हा साहित्य विकास मंडळातर्फे श्यामा प्रसाद मुखर्जी उद्यान जळगाव येथे दिनांक १८ जुलै २०२२ रोजी महसुलचे सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी एस.पी. झाल्टे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाले.
प्रारंभी आण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
चर्चासत्रात सुखदेव वाघ, भास्करराव चव्हाण,रमजान तडवी,शशांकभाऊ झाल्टे यांनी सहभाग नोंदवला.प्रितेश बाविस्कर, सागर कोळी, गोविंद देवरे, उमाकांत वाणी यांनी ‘ आठवणींची मालिका ‘ कविता तर विजय लुल्हे यांनी ‘ पिशाच्च ‘ ही गझल सदृश्य कविता सादर केली.गोविंद देवरे, प्रितेश बाविस्कर, सागर कोळी यांनीही कविता सादर केल्या.सुखदेव वाघ यांनी खड्या आवाजात अण्णा भाऊ साठे यांच्या वाड़मयीन कर्तृत्वावर पोवाडा सादर करून वातावरण निर्मिती केली त्यावेळी उपस्थिती ठेका धरून त्यांना उत्स्फूर्त साद दिली.कार्यक्रमाचे अध्यक्ष एस.पी. झाल्टे यांनी अध्यक्षीय भाषणात आण्णा भाऊ साठे यांचा जीवनपट उलगडला.प्रस्तावना मंडळाचे अध्यक्ष कवी गोविंद देवरे तर सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन सुखदेव वाघ यांनी केले.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.