आधी कोरोनाचे संकट,आणि आताअवकाळी पाऊस,शेती उध्वस्त,शेतकरी हातबल…….

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
महिला प्रतिनिधी योगिता रसाळ
दौंड(प्रतिनिधी)-अवकाळी पावसाने राज्यभरात अनेक ठिकाणी बेमौसम हजेरी लावली आहे.हवामान विभागाने वर्तवल्याप्रमाणे राज्यातील विविध भागात तुरळक अवकाळी पाऊस तर काही ठिकाणी मेघगर्जना आणि विजेच्या कडकडाटासह तर कुठे गारांचा पाऊस कोसळत आहे.
होळीच्या दिवशी ऐन मार्च महिन्यात पाणी शिंपडल्यासारखा पाऊस पडल्यानंतर आता पुन्हा राज्यावर अवकाळी पावसाचा संकट उभे राहिले आहे.राज्यात आभाळ भरून येऊन पाऊस पडत आहे.परिणामी पुढचे काही दिवस राज्यात अवकाळी पावसाचे सावट आहे.
बदलत्या हवामानामुळे वातावरणात होणारे बदल सर्वांसाठी त्रास दायक ठरत आहेत.त्यातच याचा सर्वात मोठा फटका हा शेतीला बसत आहे शेतकरी सध्या कांदा,गहू ,हरभरा या पिकांच्या काढणीत गुंतला आहे.
अशावेळी अवकाळी पाऊस बळीराजासाठी चिंताजनक ठरला आहे.यामुळे अनेक ठिकाणी शेतीचं मोठं नुकसान झाल्याचे ही समोर येत आहे.