आमदारांना मोफत घर देण्यापेक्षा ग्रामीण भागातून येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना निवारा द्या-आमदार मंगेश चव्हाण

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार मलिक
चाळीसगांव(प्रतिनिधी)-मुंबईमध्ये 300 आमदारांना म्हाडातर्फे कायमस्वरुपी घरं देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल अधिवेशनात केली
यानंतर या निर्णयावरुन सर्वसामान्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.मात्र सर्वसामान्यांचा विचार करत चाळीसगांव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी आपले वयक्तिक मत प्रसार माध्यमांसमोर मांडत सांगितले की राज्यातील शेतकरी व सर्वसामान्य वर्गाच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करून आमदारांना घरे देण्याचा महाविकास आघाडी सरकारचा निर्णय चुकीचा असून मी वैयक्तिक रित्या आमदार या नात्याने याचा विरोध करतो.
घर नाही म्हणून कोणता आमदार मुंबईत रस्त्यावर झोपला असं आजवर झाले नाही.आमदारांऐवजी ग्रामीण भागातील हजारो रुग्ण मुंबईत उपचारासाठी येतात त्यांच्या नातेवाईकांना निवाऱ्यासाठी ती घरं उपलब्ध करून देण्यात यावीत अशी मागणी देखील केली, आमदार चव्हाण सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असून आपल्या विशिष्ट कार्यशैली मुळे नेहमी चर्चेत असतात आणि आता या योजने अंतर्गत स्वतःला घर नको आणि या घोषणेला विरोध करत,इतर आमदारांना सुद्धा घर न देता गरजूंना निवारा द्या त्या गरजूंना जे आपल्या नातेवाईकांना उपचारासाठी मुंबईत घेऊन येतात रस्त्यावर झोपून रात्र काढतात आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितले ते नुसते शब्द नसून रुग्णांच्या उपचारासाठी मदत करतांना रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांना येणाऱ्या अडचणींचा अनुभव आहे.