आमदार मंगेशदादा चव्हाण अंत्योदय जनसेवा कार्यालयात मोफत पीकविमा नोंदणी ला उत्स्फूर्त प्रतिसाद…

संपादक गफ्फार शेख(मलिक)
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
चाळीसगाव(प्रतिनिधी)- तालुक्यातील शेतकऱ्यांची जास्तीत जास्त पीकविमा नोंदणी व्हावी तसेच त्यांची आर्थिक लूट होऊ नये यासाठी आमदार मंगेशदादा जनसेवा अंत्योदय कार्यालयात प्रधानमंत्री पीकविमा योजना मोफत नोंदणी सुरु करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांनी आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर त्यांची ऑनलाईन नोंदणी करण्यात येऊन तात्काळ पीकविमा प्रमाणपत्राची प्रत मोफत देण्यात येते. ४ दिवसात दिवसात २५० हुन अधिक शेतकऱ्यांचा पीकविमा कार्यालयामार्फत काढण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेतून देशभरात राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री पीकविमा योजना शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आली आहे. यापूर्वी शेतकऱ्यांना सदर पीकविमा योजनेत सहभागी होण्यासाठी आपला हिस्सा भरावा लागत होता मात्र आता राज्यात मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस यांनी घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयामुळे सदर शेतकरी हिस्सा देखील शासन भरणार असून शेतकऱ्यांना केवळ नाममात्र १ रुपया भरावा लागणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सदर योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी केले आहे.
यामुळे राज्यातील कोट्यवधी शेतकऱ्यांची मोठी आर्थिक बचत होणार आहे, तसेच पीकविमा योजनेत सहभागी होण्याचे प्रमाण देखील वाढणार आहे. विविध नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्यास नुकसानभरपाईचे आर्थिक संरक्षण यामुळे शेतकऱ्यांना मिळेल..