अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी गफ्फार शहा

चाळीसगाव येथील प्रभाग क्रमांक एक मध्ये आज तालुक्याचे आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले असून यामध्ये निंब वड पिंपळ कहूट अशा प्रकारचे विविध जातीचे वृक्ष लावण्यात आले असून हे वृक्ष प्रत्येकाने जबाबदारी घेऊन जगवावे असे यावेळी मंगेश दादा चव्हाण यांनी उपस्थित नागरिकांशी बोलताना सांगितले याचवेळी नीरज पाटील या विद्यार्थ्यांचा आज असलेला वाढदिवस त्याच्या हस्ते वृक्ष लावून साजरा करण्यात आला व पुढील वर्षी या वृक्षाचा वाढदिवस व नीरज चा वाढदिवस सोबत साजरा करू असेही यावेळी चव्हाण यांनी सांगितले

याप्रसंगी नगरसेवक घृष्णेश्वर तात्या पाटील,सह्याद्री प्रतिष्ठान चे दिलीप घोरपडे, एडवोकेट राजेंद्र सोनवणे, सुदाम त्रिमाळी, संदीप पाटील, मनोज निकम, हिलाल बोरसे, डी आर सूर्यवंशी, राजेंद्र बोरसे, दामोदर माळी, गोकुळ माळी, हिम्मत अहिरराव, अविनाश घुगे, मनोज निकम, ज्ञानेश्वर गोसावी, दीपक जगताप, भालचंद्र देसले हे उपस्थित होते