अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी सनी घावरी
पिंपरी-चिंचवड शहरात दहा दिवसांच्या पुन्हा लॉकडवऊन ची
घोषणा करण्यात आली आहे. त्याची अंमलबजावणी
काटेकोरपणे पोलिसांकडून केली जात आहे. या कालावधीत
विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्या नागरिकांवर पोलिसांकडून
कारवाई केली जात आहे.प्रसंगी पोलिसांकडून चोप देखील नागरिकांना दिला जात आहे. मात्र पोलिसांच्या या कारवाईला नागरिक जुमानत नसल्याचे चित्र शहरात पाहायला मिळत आहे,नागरिकांनी केवळ अत्यावश्यक वस्तूंची खरेदी तसेच वैद्यकीय कारणांसाठी घराबाहेर पडावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मात्र नागरिक अजूनही विनाकारण घराबाहेर फिरताना दिसत आहेत. रविवार दि. 19/7/2020 करण्यात आलेल्या कारवाईमध्ये देहूरोड पोलिसांनी सर्वाधिक कारवाई केली आहे. देहूरोड पोलिसांनी एका दिवसात तब्बल 111 जणांवर भारतीय दंड विधान कलम 188 नुसार कारवाई केली आहे. रविवारी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम
188 नुसार केलेली कारवाई पुढीलप्रमाणेे
एमआयडीसी भोसरी (59), भोसरी (13), पिंपरी (15), चिंचवड
(14), निगडी (19), आळंदी (1), चाकण (8), दिघी (39), म्हाळुगे
चौकी (1), सांगवी (22), वाकड (25), हिंजवडी (12), देहूरोड
(111), तळेगाव दाभाडे (34), तळेगाव एमआयडीसी (6),
चिखली (18), रावेत चौकी (8),