अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार मलिक

चाळीसगाव :- दिनांक 01 जून बुधवार रोजी सलग 74 वर्ष प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासासाठी निरंतर धावणारी एस.टी. अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करीत असून दरवर्षी 01 जून रोजी साजरा होणारा वर्धापन दिन चाळीसगाव आगारात उत्साहात संपन्न झाला.
सर्व आगार परिसर आकर्षक रांगोळ्यांनी सजवण्यात आलेला असून आंब्याच्या पानांची तोरणे व केळीच्या खांबांनी संपकाळानंतर पहील्यांदाच आगाराला नवचैतन्य प्राप्त झालेले दिसून येत होते.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून कवी गौतम कुमार निकम, शाहीर वाल्मीक फासगे, कवी रमेश पोतदार हे उपस्थित असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आगाराचे व्यवस्थापक संदीप निकम यांनी भूषविले.
शाहीर वाल्मीक फासगे यांनी लालपरी कविता सादर करून एसटी चा इतिहास काव्यातून वर्णन केला तर कवी गौतम कुमार निकम यांनी राज्य परिवहन महामंडळाची सुरक्षित सेवा जनसामान्यांसाठी किती महत्त्वाची आहे याची जाणीव कोरोना काळात व संपकाळात झाल्याचे नमूद करून खऱ्या अर्थाने एसटी लोकवाहिनी असल्याचे प्रतिपादन केले.
प्रवाशांच्या सेवेसाठी अविरत धावणारी एस.टी.बस सुरक्षित सेवा देण्यासाठी सज्ज असून महाराष्ट्रात आज अत्याधुनिक इलेक्ट्रिक बसचा लोकार्पण सोहळा होत असल्याचे कार्यक्रमाचे अध्यक्ष संदीप निकम यांनी नमूद केले.
सर्व मान्यवरांच्या हस्ते केक कापून एसटीचा वर्धापन दिवस साजरा करण्यात आला असून प्रवाशांना गुलाब पुष्प व पेढ्यांचे वाटप करून आनंद साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहाय्यक वाहतूक अधीक्षक किशोर मगरे, कार्यशाळा अधीक्षक मनोज भोई,पाळी प्रमुख आनंदा साळुंखे, वाहतूक नियंत्रक किरण काकडे,रमेश राठोड, लक्ष्मीकांत बोरसे, भाऊसाहेब हडपे,उमेश निकम, सुरेश गायकवाड, दीपक जाधव, संजय जाधव,फरिद मुल्ला, उदय सोनवणे,हेमराज जाधव,किशोर नागरे,दामू जाधव, अरूण वाणी,अनिल जाधव,चेतन वाघ,शफी शहा ,सुनिल जाधव, मंगला पाटील,यशवंत पाटील,आबा पाखले,रवि राठोड,आबा नालकर यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन बाबा पाठक यांनी तर आभार किशोर मगरे यांनी व्यक्त केले.