संपादक गफ्फार मलिक(शेख)
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
चाळीसगांव(प्रतिनिधी)-शहरातील डेपोच्या एसटी बस ह्या फार जुन्या झाल्याने वारंवार कोठेही बंद पडत आसल्याने याचा प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.नागद रोड वर मंगळवारी, दि 9 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास चाळीसगांव, नागद, नेरी ते कजगाव जाणारी चाळीसगांव डेपोची एसटी बस रोडवर अचानक बंद पडली. परिणामी प्रवाशांना विनाकारण ताटकळत रस्त्यावर उभे राहवे लागले.
वारंवार रस्त्यांवर बंद पडणाऱ्या बसेस म्हणजे नाहक प्रवाश्यांना मानसिक त्रास होत असतो,नादुरुस्त बसेस मुळे रस्त्यावर अपघात घडल्यास यात प्रवाशांचा जीवही जाऊ शकतो असे झाल्यास जबाबदार कोण? याकडे देखील मंडळास लक्ष देण्याची गरज आहे,तसेच योग्य तपासणी केल्या शिवाय बस रस्त्यावर सोडू नये अशी मागणी प्रवाश्यांमार्फत जोर धरू लागली आहे,सध्या शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह जेष्ठ नागरिक, नोकरदार वर्ग प्रवासासाठी एसटीलाच प्राधान्य देतात.अश्या प्रकारे एस टी रस्त्यावर खराब झाल्यास विध्यार्थी,नोकरदार यांना याचा फटका बसत असतो यामुळे एसटी महामंडळाने चांगल्या बस रस्त्यावर सोडाव्यात, अशी मागणी प्रवाशी करत आहेत.