ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेण्यात यावी या मागणीसाठी दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन

0 0
Read Time4 Minute, 38 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी सनी घावरी

निगडी,(अधिकार आमचा)- निगडीतील पवळे चौकात
विद्यार्थ्यांनी ऑनलाइन परीक्षांसाठी आंदोलन केले
या आंदोलनामध्ये 150 विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग
होता .आंदोलनाचे प्रमुख मागणी ऑनलाइन परीक्षा घेण्यात
यावी अशी होती. सकाळी दहा वाजता निगडी पवळे
चौकातील टिळक पुतळा जवळ दहा बारा जणांनी एकत्र
येऊन आंदोलनाचा श्रीगणेशा केला जात असे विद्यार्थी येत
गेले तर हा आकडा वाढून 150 पर्यंत जाऊन पोहोचला या
आंदोलनाच्या संबंधित पिंपरी चिंचवड मधील विद्यार्थ्यांचा
समावेश होता.
आंदोलनातील आंदोलक हे प्रथमच आंदोलनस्थळी भेटले
गेले होते अनोळखी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन केलेले आंदोलन
हे होते त्यासाठी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर
वापर करण्यात आला विद्यार्थ्यांनी गुगल फॉर्म मार्फत एक
सर्वे केला जात पिंपरी-चिंचवड मधून दहावी-बारावी 47
हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा ऑनलाइन घेण्यात यावी अशी
प्रतिक्रिया दिली. हे आंदोलन कोरोनाचे प्रादुर्भाव पाहता सर्व नियम पाळून करण्यात आले यात कोणतीही घोषणा न करता विद्यार्थ्यांनी एक स्टैंडिंग मेसेज शासनाला दिला स्थानिक पोलिसांच्या प्रयत्नानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. पोलिसांकडून विद्यार्थ्यांचे निवेदन मुख्यमंत्री महाराष्ट्र यांच्याकडे पोहोचवले जाईल अशी हमी विद्यार्थ्यांनी पोलिसांकडून घेतली गेले.
वर्षभर राज्यात अभ्यास ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आला
तर वर्षभर अभ्यास होऊ शकतो. तर परीक्षा पण ऑनलाईन
होऊ शकते सध्याचा काळ कोरोना ग्रस्त आहे दिवसेंदिवस
राज्यात कोरोना बळावत आहे. पाच पेक्षा जास्त जणांना
एकत्र येण्यास राज्यात मज्जाव केला जात आहे आणि
दुसऱ्या बाजूला 31 लाख विद्यार्थ्यांना एकाच वेळी परीक्षा
केंद्रांवर बोलावले जात आहे. त्यामुळे दोन्ही निर्णयात मोठा
विरोधाभास आहे सरकारची परीक्षा व करण्याची यंत्रणा
सक्षम आहे. असे विधान एका बाजूला केले जाते आणि
दुसऱ्या बाजूला सक्षम यंत्रणा राज्यातील कुरणावरती बंद
करता येत नसल्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री
आमची भाषा करत आहेत याचा अर्थ यंत्रणाही सक्षम नाही
आणि त्यावर कहर म्हणजे जर राज्यात असंख्य विद्यार्थी
कोरोनामुळे पॉझिटिव झाले आणि त्या दुर्दैवाने विद्यार्थ्यांचा
जर मृत्यू झाला तर याची जबाबदारी महाराष्ट्रातील
सक्षम यंत्रणा घेताना दिसत नाहीये याची सर्व जबाबदारी
विद्यार्थ्यांकडून हमीपत्र घेऊन पालकांवर व विद्यार्थ्यांना थेट
ढकलली जात आहे.
या सर्वांचा विचार करता शासनाने विद्यार्थ्यांची जबाबदारी
घेणारे हमीपत्र आम्हाला द्यावे अन्यथा परीक्षा ऑनलाइन
पद्धतीने घेण्यात यावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे
पोलीस पत्रकार तसेच सर्व विद्यार्थी यांच्या सहकार्यासाठी
आंदोलनाचे संयोजक अनिश काळभोर,अनुराग
पाटील,अनुपम कुंभार, हर्षद फडतरे,अभिषेक महाजन,
विषाल खराडे, शिवसंग्राम कदम ,ऋतुजा बुगडे, जानवी
पाटील, श्रेयस पुंड यांनी त्यांचे आभार मानले.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %
Author: admin

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *