कास्ट्राईब शिक्षक महासंघाच्यावतीने हनुमंत काळे यांच्या कुटुंबीयांना ३३११५ रुपयाची मदत

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी विजय जाधव
दौंड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष गौतम कांबळे यांच्या नेतृत्वाखाली वंचित,आदिवासी कुटूंबातील कालकथित हनुमंत काळे शिक्षकेत्तर कर्मचारी मार्डी तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर यांच्या कुटुंबीयांना रुपये ३३११५ एवढी मदत करण्यात आली .हनुमंत काळे यांनी शिक्षण व्यवस्थेतील अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली आहे.रविवार दिनांक३/९/२०२३ रोजी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाच्यावतीने काळे कुटूंबियांची भेट घेऊन सांत्वन केले व ३३११५ रुपयाची मदत केली .या वेळी हनुमंत काळे यांचे वडील विठ्ठल काळे यांनी हनुमंत काळे यांना २०१६ पासून मान्यता, शालार्थ वेतन प्रणालीमधील आय डी मिळवताना झालेला त्रास ,घरची गरीब परिस्थितीमुळे व भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे होणारा त्रास असह्य झाल्याने कुटूंबियांवर अशी वाईट वेळ ओढावली असल्याचे सांगितले . या पुर्वी एकही शिक्षक संघटना भेटायला आली नाही परंतु महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे प्रयत्न उपयोगी पडत आहेत व ही केलेली मदत लाख मोलाची आहे असे मत विठ्ठल काळे यांनी व्यक्त केले . हनुमंत काळे सरांना आत्महत्येसाठी भाग पाडणाऱ्या सर्वांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी विनंती कुटूंबियांनी कास्ट्राईब शिक्षक महासंघाकडे केली. महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाच्या वतीने काळे कुटूंबियांना ३३११५ रूपये मदतनिधी दिला , पुढील शासकीय लाभासाठी प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन दिले . यासाठी माध्यमिक संचालक , उपसंचालक पुणे, माध्यमिक शिक्षणाधिकारी जि प .सोलापूर, जिल्हाधिकारी सोलापूर, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर, पोलिस अधीक्षक सोलापूर यांना निवेदन देऊन हनुमंत काळे यांना आत्महत्येस जबाबदार अधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याबाबत निवेदन देण्यात आले असल्याची माहिती काळे कुटुंबियांना देण्यात आली आहेत . यावेळी राज्याध्यक्ष गौतम कांबळे , राज्य सल्लागार दिगंबर काळे ,राज्य महासचिव विठ्ठल सावंत , सोलापूर दैनिक पुण्यनगरीचे उपसंपादक भरतकुमार मोरे , राज्य संघटक सत्यदेव खाडे ,जिल्हाध्यक्ष विलास काळे जिल्हा महासचिव विठोबा गाडेकर जिल्हा संघटक सिद्धेश्वर नारनवर ,जिल्हा कोषाध्यक्ष शंकर लोणकर , मयत हनुमंत काळे यांचे आई वडील , पत्नी व लहान मुले , नातेवाईक व महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे सोलापूर जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते .