Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

कुंझरकर यांचा वाढदिवस निमित्ताने एरंडोलशिक्षण विभागातर्फे सत्कार गौरव,साधेपणाने साजरा,

0
1 0
Read Time9 Minute, 52 Second


एरंडोल( वाढदिवस विशेेेष):एरंडोल तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये स्वेच्छेने सर्वप्रथम तळई येथे सेमी इंग्रजी माध्यमांची सुरुवात करणारी तसेच जिल्हा परिषद शाळा टिकविण्यासाठी व पटसंख्या वाढविण्यासह जिल्हा परिषद शाळा विषयी ग्रामीण भागातील पालकांचा आत्मविश्वास वाढावा यासाठी स्वयंप्रेरणेने स्वतःच्या दोन्ही मुलांना वाढत्या खाजगी माध्यमाच्या इंग्रजी शाळांच्या युगात जिल्हा परिषदेच्या शाळेतच पहिली ते चौथी पर्यंतचे शिक्षण देणारे किशोर पाटील कुंझरकर यांचा ४० वाढिवसानिमित्त एरंडोल पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्यावतीने तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी विश्वास हरी पाटील शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार व यथोचित सन्मान करून गौरव करून भावी वाटचालीसाठी शिक्षण विभागाच्या वतीने आपल्या दालनात शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी एरंडोल मराठी केंद्राचे केंद्रप्रमुख नारायण बोरसे , एरंडोल ऊर्दू केंद्राचे केंद्रप्रमुख अल्लाउद्दीन शेख सर, मराठी शाळा व उर्दू शाळांच्या शिक्षक मित्र परिवार उपस्थित होते. किशोर पाटील कुंझरकर हे मनमाड व अभ्यासू व सर्वांना सोबत घेऊन चालणारे लाडके व्यक्तिमत्व असून महाराष्ट्र राज्यातील शिक्षक संघटनांच्या राज्य समन्वय समितीचे राज्य समन्वयक तसेच महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाचे राज्य महासचिव म्हणून काम करीत असताना शैक्षणिक प्रश्न सोबतच गुणवत्ता वाढविणे,कार्यात नवनवीन प्रयोग करीत असतात. महाराष्ट्र शासनाच्या इंग्रजी भाषा विकासाच्या तेजस प्रकल्पांतर्गत ब्रिटिश कौन्सिल द्वारेऑनलाईन टेलिफोनिक इंटरव्यू द्वारे त्यांची टॅग कॉर्डिनेटर म्हणून मागील वर्षापासून निवड झालेली आहे. तेजस प्रकल्पांतर्गत इंग्रजी भाषा विकासासाठी तालुक्यातील शिक्षकांसाठी त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे. गाव तिथे विकास मंच ,गाव तिथे वाचनालय, गाव तेथे बेटी बचाव बेटी पढाव, गाव तेथे जिल्हा परिषद शाळा वाचवा चे उपक्रम यासाठी सातत्याने सर्वांना मदत करणे प्रेरित करणेकरीत असलेले त्यांचे प्रयत्न अनुकरणीय असल्याचे यावेळी गटशिक्षणाधिकारी विश्वास पाटील यांनी म्हटले. वाढदिवसानिमित्त त्यांना निवासस्थानी जाऊन मोहन चव्हाण, समाजसेवक नूरुद्दीन मुल्लाजी ,अण्णा मिस्त्री, महिला शिक्षक संघटनेच्या अरुणा उदवंत, पुष्पलता आनंदराव पाटील ,वृषाली सोनार, माध्यमिक शिक्षक पतसंस्था जळगाव जिल्ह्याची सचिव मनोहरराव सूर्यवंशी व मित्रपरिवारआदींसह शैक्षणिक, सामाजिक, सहकार पत्रकारिता, राजकीय, सामाजिक कार्य क्षेत्रातील अनेक मान्यवर व पदाधिकार्‍यांनी आज एरंडोल येथे भेट देऊन सत्कार केला व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सकाळी एरंडोल येथील निवासस्थानी आई प्रभावती पाटील यांनी व सौभाग्यवती जयश्री किशोर पाटील , क्षितिज पाटील,प्रांजल पाटील व परिवाराने औक्षण केले केलेनामदार बाळासाहेब थोरात नामदार छगन भुजबळ, जामनेर चे आमदार गिरीश भाऊ महाजन, खासदार उन्मेश दादा पाटील आमदार मंगेश चव्हाण, आमदार राजूमामा भोळे, नामदार गुलाबराव पाटील यांचे निकटवर्तीय विश्वनाथ दादा पाटील, आमदार चिमणराव आबा पाटील, आमदार दादाजी भुसे,मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर, विभागीय अध्यक्ष रामदादा पवार सर व पदाधिकारी, जमील भाई देशपांडे, पूर्व शिक्षण संचालक गोविंद नांदे डे, संचालक दिनकर पाटील,राज्य समन्वय समितीचे राज्य अध्यक्ष अर्जुन राव, साळवे अरुण राव जाधव, इलाह उद्दीन फारुकी, शिक्षक आमदार सुधीर तांबे शिक्षक आमदार विक्रम काळे, शुभांगी पाटील, अरविंद भाऊ देशमुख, पियुष पाटील विनोद देशमुख पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण भाऊ सपकाळे ,भगवान भाऊ सोनार हेमंत पाटील, आदींसह विविध शिक्षक संघटनांचे राज्याध्यक्ष जिल्हाध्यक्ष ग स सोसायटीचे आजी-माजी संचालक अनेक मान्यवरांनी दूरध्वनीद्वारे किशोर पाटील कुंझरकर यांना शुभेच्छा दिल्यात. यावर्षी शिक्षक नेते माजी आमदार शिवाजीराव पाटील यांचे निधन झाल्यामुळे वाढदिवस साधेपणाने साजरा करण्याचे ठरविले होते. व्यक्तिगत जीवनात सर्व थोर महापुरुषांच्या जीवनचरित्रातून व सर्व क्षेत्रातील उत्तुंग कार्य करणाऱ्या ज्येष्ठ-श्रेष्ठ व्यक्तिमत्त्वांच्या माध्यमातून खूप काही शिकायला मिळते. प्रेरणा मिळते. कोणी निंदा कोणी वंदा आपण सरळ मार्गाने आपले चांगली काम करत राहावे आणि कुणाचाही द्वेष व्यक्तिगत जीवनात कधीच न करणे,कोणाशीही स्पर्धा न करणे व सर्व विचारधारांचा आदर करणे हे आपले महत्वाचे सूत्र आहे. मित्रपरिवाराने दिलेल्या शुभेच्छा प्रेरणादायी असून येणाऱ्या काळात शिक्षणासाठी एक सुत्री एकच राज्यव्यवस्था असावी, सुरुवातीपासून शेवटपर्यंत शैक्षणिक धोरणांमध्ये समन्वय व सुसूत्रता आणण्यासाठी राज्यात प्राथमिक माध्यमिक व सर्व शाळांसाठी शिक्षणाचे स्वतंत्र महामंडळ असावे, जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांना शिक्षक आमदारकीसाठी सरसकट मतदानाचा व प्रतिनिधित्वाचा अधिकार असावा, जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांची संख्या खूप मोठी असून त्यांचा एक प्रतिनिधी विधानपरिषदेवर घेण्यात यावा, जुनी पेन्शन हक्क सरसकट सर्वांना मिळावा, समान काम समान वेतन, राज्यातील सर्व शिक्षक संघटनांचा एकच फोरम असावा ,राज्य शासन तसेच राष्ट्रीयआदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांना इतर पुरस्कारार्थी प्रमाणे एसटी बस प्रवास सवलत राज्यात मोफत मिळावी यासाठी शिक्षकांच्या शैक्षणिक 108प्रलंबित प्रश्न व अशैक्षणिक कामांमधून त्यांना वगळण्यात यावे यासाठी भावी काळात प्रामाणिकपणे व सर्वांच्या मदतीने पाठपुरावा करू असे यावेळी बोलताना शिक्षक संघटना राज्य समन्वय समितीचे राज्य समन्वयक किशोर पाटील कुंझरकर म्हणाले. नस्तनपुर देवस्थान पद्मालय देवस्थान त्याच जोडीने राळेगणसिद्धी येथील भ्रष्टाचार निर्मूलन मित्रपरिवाराने देखील अभिनंदन केले. वाढदिवसाच्या निमित्ताने विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रतिक्रिया दिली असून सार्वजनिक जीवनातील एक धडपडणारा शिक्षण व सामाजिक क्षेत्रातील कृतीशील नेतृत्व म्हणजे किशोर पाटील कुंझरकर असल्याचे म्हटले.

Happy
Happy
100 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: