
केतन पाटील यांची अखिल भारतीय मराठा महासंघ चे युवक तालुका अध्यक्षपदी तर मिलिंद मराठे यांची भडगाव रोड विभाग प्रमुखपदी निवड
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार मलिक
चाळीसगाव (प्रतिनिधी)-अखिल भारतीय मराठा महासंघाची शासकीय विश्रामगृह येथे दिनांक 27 मार्च रोजी मराठा समाजाचे काम करण्यास आवड असणाऱ्या युवकांची मीटिंग आयोजित करण्यात आली होती.
यावेळी युवक जिल्हाध्यक्ष ललित पाटील यांनी उंबरखेड केतन पाटील यांचेशी मराठा महासंघाच्या कामाविषयी चर्चा करून आजच्या बैठकीला हजर राहण्यास सांगितले होते. तसेच शहराध्यक्ष खुशाल बिडे यांनी मिलिंद मराठे यांच्याशी मराठा महासंघाच्या कामाबाबत चर्चा केली होती. यामुळे केतन पाटील, आणि मिलिंद मराठे बैठकीला उपस्थित होते. शहराध्यक्ष खुशाल बिडे यांनी मराठा महासंघाचे ध्येयधोरणे सदर बैठकीत उपस्थित सर्वांना समजावून सांगितले. त्यावेळी केतन पाटील, मिलिंद मराठे यांनी पदाधिकारी म्हणून मराठा महासंघाचे काम करण्यास तयारी दाखविली. म्हणून शहराध्यक्ष यांनी उंबरखेड येथील केतन नितीन पाटील यांची युवक चाळीसगाव तालुका अध्यक्षपदी तर भडगाव रोड विभाग प्रमुख मिलिंद देविदास मराठे यांची नियुक्ती केली. उपस्थित सर्व मराठा बांधवांनी दोघांचे अभिनंदन केले शहराध्यक्ष यांनी दोघांना शुभेच्छा देऊन आपल्या हातून मराठा समाज हिताचे काम व्हावेत अशी अपेक्षा बाळगून पुनश्च शुभेच्छा दिल्या. यावेळी मराठा महासंघाचे तालुका अध्यक्ष दिपक शेटे, शहराध्यक्ष खुशाल बिडे,शहर उपाध्यक्ष,जगदीश वाघ तालुका संघटक रमेश पाटील,शहर सचिव रामचंद्र सूर्यवंशी, कार्याध्यक्ष सिद्धांत पाटील, शहर संघटक मोतीराम मांडोळे, घाट रोड विभाग प्रमुख संजय पाटील, महिला शहर अध्यक्ष रत्ना पाटील , उपाध्यक्ष आशा पाटील, सन्माननीय सदस्य सागर बोरसे, दिलीप अहिरे, तसेच मराठा बांधव अविनाश मुलमुले, सचिन गायकवाड, कुतेश पाटील, धनंजय मराठे, आबा पाटील, उदय भोसले, योगेश बिडे, प्रशांत बिडे, अजय जोगी, भूषण भावसार, रवींद्र पाटील इत्यादी उपस्थित होते.
Related
More Stories
महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाच्या वतीने राज्याध्यक्ष गौतम कांबळे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन संपन्न
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क उपसंपादक रोहित शिंदे पुणे-महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाच्या वतीने शिक्षण आयुक्त कार्यालय सेंट्रल बिल्डिंग पुणे येथे...
राष्ट्रीय अन्नसुरक्षा अंतर्गत शिधापत्रिकाधारकांना धान्याचा लाभ द्या- तहसीलदारांना रयत सेनेच्या वतीने निवेदन
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगाव प्रतिनिधी - शासनाच्या वतीने बीपीएल अंत्योदय तसेच केशरी कार्डधारकांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा अंतर्गत...
500 कोटी जलसाठा टीम च्या वतीने नदी पात्राची सफाई,सायकलिंग ग्रुप च्या वतीने 76 हजाराचे योगदान…
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगाव(प्रतिनिधी)- शहरातील तितूर व डोंगरी नदी पत्र अरुंद झाल्यामुळे मागच्या वर्षी अतिवृष्टी झाल्यामुळे...
गावठी दारू सह 4 लाख 71 हजार 350 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त यवत पोलिसांची कामगिरी
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक यवत-दि 13 मे 2022 रोजी गावठी हातभटटी दारूची वाहतुक करणाऱ्याला अटक करत,चार लाख...
चाळीसगाव येथे मंगळग्रह मूर्तीची प्राणप्रतिष्ठा,14 मे रोजी महाप्रसादाचे आयोजन…
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगाव(प्रतिनिधी)-शहरातील गांधी चौक येथील महादेव मंदिराराजवळ आज दिनांक 13 रोजी मंगळग्रह मूर्तीची प्रतिष्ठापना...
जिल्हा रुग्णालयात कैद्यांची हाणामारी, 4 पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन…
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक जळगाव- जिल्हा रूग्णालयात कैद्यांच्या दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारी प्रकरणी पोलीस कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा कर्तव्यात कसूर...
Average Rating