
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव(प्रतिनिधी)- अंदाजे दुपारी 2 वाजेच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसात चाळीसगाव तालुक्यातील कोंगानगर येथे विजेचा भीषण प्रसंग घडला.वीज कोसळून तिघांचा मृत्यू झाला असून,या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मृतांमध्ये समाधान प्रकाश राठोड (वय 9, रा. जीऊर, ता. कन्नड), दशरथ उद्दल पवार (वय 27, रा. वाघळे कोंगानगर तालुका चाळीसगाव), आणि लखन दिलीप पवार (वय 13, रा. वाघळे, कोंगानगर तालुका चाळीसगाव) यांचा समावेश आहे. हे तिघे कोंगानगर शिवारात शेतात शेतीची कामे करण्यासाठी गेले असता पाऊस सुरू झाल्याने आसरा घेण्यासाठी झाडाखाली उभे असताना अचानक वीज कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या दुर्दैवी घटनेमुळे कुटुंबीयांवर शोककळा पसरली असून, स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून पुढील तपास ग्रामीण पोलिस करत आहे.