अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव (प्रतिनिधी):“नगरपालिकेत 35 वर्षांत जितका निधी आला नाही, तितका मी 35 महिन्यांत आणला. सत्तेमुळे निर्माण होणारा बदल तुम्ही स्वतः अनुभवत आहात. शहरात अजूनही काही समस्या शिल्लक आहेत, मात्र इच्छा शक्ती, नियोजन आणि सातत्य असेल तर त्या टप्प्याटप्प्याने सोडवू शकतो. जनतेने 35 वर्षे इतरांवर विश्वास ठेवला; फक्त 10 वर्ष माझ्यावर विश्वास ठेवा, चाळीसगावला बदलून दाखवू,” असे प्रतिपादन आमदार मंगेश चव्हाण यांनी केले.
वार्ड १७ मध्ये आमदार मंगेश चव्हाण यांची जोरदार जाहीर सभा
चाळीसगाव नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वार्ड क्रमांक १७ मध्ये जय बाबाजी चौकात भारतीय जनता पक्षाच्या प्रचारार्थ भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.घोषणा आणि युवा कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमुळे परिसरात निवडणूक रंगत वाढली होती.
सभेच्या प्रारंभी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी विकासकामांचा आढावा सादर केला. त्यानंतर आमदार चव्हाण यांचे भाषण सुरू होताच उपस्थितांनी टाळ्यांच्या गजराने स्वागत केले.

“हजार कोटींच्या कामांची क्षमता आम्ही सिद्ध करणार”
निधी आणण्याच्या क्षमतेवर भाष्य करताना आमदार चव्हाण म्हणाले,
“काही लोक केवळ घोषणा करतात. कोणता नेता जर म्हणत असेल की ‘मी हजार कोटींचा निधी आणतो’; तर दुसऱ्या दिवशी त्याला माझा पाठिंबा देण्यास मी तयार आहे. परंतु शंभर वेळा सांगतो – हजार कोटींच्या कामांची ताकद, क्षमता आणि धैर्य आमच्याकडे आहे. यासाठी राजकीय इच्छाशक्ती आणि विकासासाठीचा प्रामाणिक दृष्टिकोन आवश्यक आहे.”
यावेळी त्यांनी गेल्या ३५ महिन्यांत झालेल्या प्रमुख विकासकामांची झलकही नागरिकांसमोर मांडली. पायाभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, वॉर्डस्तर समस्यांचे निराकरण,उद्यान आदी कामांचा त्यांनी विशेष उल्लेख केला.
प्रभागातील प्रश्नांची थेट मांडणी
सभेपूर्वी आमदार चव्हाण यांनी प्रभागातील नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधला. रस्ते, पाणी, ड्रेनेज,आरोग्य,अश्या अनेक मूलभूत सुविधांवर स्थानिकांशी चर्चा करत येणाऱ्या असणाऱ्या अडचणी समजून. त्यावर “प्रत्येक समस्येचे निराकरण प्राधान्याने केले जाईल,” अशी ग्वाही आमदारांनी दिली.
“विकास हवे तर आमच्या उमेदवारांना साथ द्या” — आमदारांचे आवाहन
यावेळी बोलताना आमदार चव्हाण म्हणाले,
“विकास म्हणजे फक्त घोषणा नाही, तर प्रत्यक्ष काम. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सक्षम नेतृत्व आणि प्रामाणिक प्रशासन गरजेचे आहे. चाळीसगावचा चेहरा बदलायचा असेल, तर आमच्या उमेदवारांना विजयी करून सशक्त नगरपरिषद द्या.”
नागरिकांची उस्फूर्त उपस्थिती
सभेस प्रभागातील शेकडो नागरिक, तरुण व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. महिला मतदारांचा लक्षणीय सहभाग ही यावेळच्या सभेची विशेष नोंद घेण्याजोगी बाब ठरली. अनेक नागरिकांनी वॉर्डात सुरू असलेल्या विकासाच्या कामांबद्दल समाधान व्यक्त करत “विकास करण्याची शैली चांगली आहे, म्हणूनच आमदार चव्हाणांवर विश्वास वाढतोय,” अशा प्रतिक्रिया दिल्या.
