Read Time1 Minute, 24 Second
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
उपसंपादक रोहित शिंदे
कजगाव(चाळीसगाव)-देशातील प्रत्येक व्यवसायास कोरोनाचा फटका बसला असून चाळीसगाव तालुक्यातील कजगाव या गावात असलेले प्रकाश ट्रेलर या ट्रॅक्टर ट्रॉली तयार करणाऱ्या कारखान्यास सुद्धा याची झळ बसली असतांना मार्च ते नोहेंबर पर्यंत बाकी असलेले 47060 रुपयांचे लाईट बिल थकीत होते थकीत असलेले लाईट बिल आज दि 25 नोहेंबर 2020 रोजी एकरकमी भरून महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळास सहकार्य केल्या बद्दल प्रकाश ट्रेलर चे मालक प्रकाश पाटील व संदीप पाटील यांचा महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ कजगाव विभागातर्फे सहाय्यक अभियंता बोरणारे साहेब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाचे योगेश देशमुख,संजय चौधरी,सिद्धार्थ निकम व कर्मचारी उपस्थित होते