
खासदार उन्मेष दादा पाटील व आमदार मंगेश दादा चव्हाण यांना चाळीसगांव जंक्शन रेल्वे प्रवाशी संघटने तर्फे सुपरफास्ट गाड्यांना चाळीसगांव स्टेशनवर थांबे देण्यासाठी निवेदन देण्यात आले.
Read Time5 Minute, 4 Second
चाळीसगाव(प्रतिनिधी):-आज दिनांक 8 मार्च 2019 रोजी खासदार उन्मेष दादा पाटील व आमदार मंगेश दादा चव्हाण यांना चाळीसगांव जंक्शन रेल्वे प्रवाशी संघटने तर्फे काही सुपरफास्ट गाड्यांना चाळीसगांव स्टेशनवर थांबे देण्यासाठी निवेदन देण्यात आले.. रेल्वे अपडाऊन प्रवाश्यांच्या मागण्या खालील प्रमाणे

- गीतांजली एक्स्प्रेस, अमरावती एक्स्प्रेस, पवन एक्स्प्रेस (अप), कर्नाटक एक्स्प्रेस, गोवा एक्स्प्रेस या गाड्यांना चाळीसगांव ” ए” ग्रेड स्थनाकावर ततात्काळ थांबा देणे.
- अजंठा एक्स्प्रेस भुसावळ पर्यंत एक्सटेंड करणे व तिला नांदगाव, चाळीसगांव, पाचोरा, जळगाव थांबे देने. मनमाडला ही एक्स्प्रेस सकळी 6.45 ला येते व रात्री 8.50 ला सिकंदाराबाद कडे रवाना होते या दरम्यान ही गाडी साधारण 14 तास मनमाडला उभी राहते. भुसावळ पर्यंत ही गाडी एक्सटेंड केल्यास दक्षिणकडे जाण्यासाठी व महाराष्ट्र एक्स्प्रेसची गर्दी कमी करण्यासाठी हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. सकाळी ६.५५ ला ही मनमाडवरून भुसावळ करिता व संध्याकाळी 5.30 ला भुसावळ वरून सिकनदाराबाद करीता सोडण्यात यावी.
- महाराष्ट्र एक्स्प्रेसला मासिक पास धारकांसाठी स्वतंत्र कोच जोडणे.
- महाराष्ट्र एक्स्प्रेसचा सोलापुर कोच काही महिन्यांपूर्वी कमी करण्यात आला त्यामूळे पांडुरंगाच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांना प्रचंड अडचणींना तोंड द्यावे लागते. त्यामुळे तत्काळ सोलापूर कोच पूर्ववत जोडण्यात यावा.
- रोहिणी स्टेशनवर (तालुका चाळीसगांव) भुसावळ मुंबई व भुसावळ देवळाली अप डाऊन दोन्ही साईडला पॅसेंजरचा अचानक रद्द करण्यात आलेला थांबा पूर्ववत पून्हा सुरु करण्यात यावा. हा थांबा बंद केल्यामूळे आजूबाजूच्या साधारण 15 गावांना मुंबई व जळगांव जाण्यासाठी प्रचंड अडचणीचा सामना करावा लागतो. रोहिणी, करंजगाव, पिपळगाव, तळेगांव, राजदेहरे, गंगाआश्रम, हातगाव, अंधारी, इसापूर तांडा, शिंदी , घोडेगाव आशा अनेक गावांना रोहिणी स्टेशन हे सोयीस्कर असून शेतकरी, नोकरदार , व्यापारी व विद्यार्थी हे सर्व रोहिणी रेल्वे स्टेशनला एकही गाडी थांबत नसल्याने हवालदील झाले आहेत.
- रामेश्वर ओखा एक्स्प्रेसला बालाजी भक्तांसाठी चाळीसगांव थांबा देणे.
- DRUCC व ZRUCC या रेल्वे प्रवाशी सल्लागार समितीवर नियमितपणे रेल्वे अपडाऊन करणाऱ्या रेल्वे प्रवाश्याची खासदार साहेबांनी रेल्वे मंत्रालयाला शिफारस करावी. जेणेकरून रेल्वे अपडाऊनच्या छोट्या मोठ्या समस्या या तत्काळ सोडवण्यासाठी प्रावाश्यना मदत होईल.
ह्या सर्व समस्या लवकरात लवकर सोडवण्यात येतिल असे आश्वासन खासदार उन्मेष दादा पाटील जळगांव लोकसभा व आमदार मंगेश दादा चव्हाण चाळीसगांव विधानसभा या दोघांनी प्रवाशी शिष्टमंडळाला दिले.. खूपच खेळीमेळीच्या वातावरणात मागण्या रेल्वे प्रवाशी यांचे कडून मांडण्यात आल्या आणि खासदार व आमदार साहेबांनी तात्काळ सकारत्मक प्रतिसाद दिला. निवेदन देताना रेल्वे प्रवाशी संघटनेचे नितिन सोनवणे, चेतन देशमुख, दिपक पवार, रवी पाटील , सागर सोनार, ललित चौधरी, बबन गांगुर्डे, कोळी साहेब, महाजन साहेब, पराग बढे, वैभव कोतकर, पाटील साहेब, गणेश संन्यासी, योगेश चौधरी, मिलिंद मगर आदी प्रवाशी प्रतिनिधी उपस्थित होते व शेकडो प्रवश्यनी निवेदनावर सह्या केल्या.
Average Rating