अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगांव(प्रतिनिधी)-जळगांव जिल्ह्याचे खासदार उन्मेष पाटील यांनी आपल्या परिवारासह धुलीवंदनाच्या रंगात रंगलेला फोटो ट्विट करत धुलीवंदनाच्या शुभेच्छा दिल्या असून सोबत चार ओळीत दिला महत्वपूर्ण संदेश
खासदार उन्मेष पाटील यांचा मनमिळाऊ स्वभाव संपूर्ण जिल्ह्याला माहीत असून आज खासदार पाटील यांनी आपल्या ट्विटर अकाउंट वरून ट्विट करत सोडूनी सारे भेदभाव,विसरुनी दुःख आणि घाव,चला उधळू या प्रेमरंग आणि भाव,धुलीवंदन निमित्त हार्दिक शुभेच्छा अश्या शब्दांमध्ये धुलीवंदनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत,खरोखर आज देशाला भेद भाव विसरून,दुःख आणि मनाचे घाव विसरून,प्रेमाने प्रेमाचे रंग व भाव उधळण्याची गरज आहे अत्यंत कमी शब्दात खासदार पाटील यांनी अंतर्मनाच्या खोलवर जात केलेले ट्विट देशाच्या प्रत्येक जाती धर्माच्या लोकांनी स्वतःला प्रथमतः देशाचे नागरिक समजून या चार ओळींना आचरणात आणण्याची गरज आहे.