
खोरवडी जिल्हा परिषद शाळेत पहिली च्या विद्यार्थ्यांसाठी शाळा पूर्वतयारी मेळावा संपन्न
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी विजय जाधव
दौंड(प्रतिनिधी)-शासन आदेशानुसार दिनांक-11 मार्च 2022 ते दिनांक-20 मार्च 2022, दरम्यान महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक शाळांमध्ये इयत्ता पहिलीतील दाखल पात्र विद्यार्थी व पालकांसाठी शाळापूर्व तयारी चे मेळावे घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शासनाच्या आदेशानुसार दौंड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खोरवडी येथे पहिला शाळा पूर्वतयारी मेळावा शनिवार दिनांक- 16 मार्च 2022 रोजी आयोजित करण्यात आला.
covid-19 मुळे बालकांचे दोन वर्षापासून शैक्षणिक नुकसान झाल्याने जून 2022 मध्ये इयत्ता पहिली दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचे पूर्वज्ञान, शारीरिक, बौद्धिक व सामाजिक विकास त्यांच्यातील उणिवा तपासण्या करून त्यांचे पुढील शिक्षण सुलभ व आनंददायी व्हावे पाल्यांना शिक्षणासाठी प्रेरित करावे या हेतूने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खोरवडी येथे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पुणे, व जिल्हा परिषद पुणे, दौंड पंचायत समिती यांच्या मार्गदर्शनाखाली शाळा पूर्वतयारीचा मेळावा शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक, व सह शिक्षक खोरवडी, अंगणवाडी कर्मचारी यांच्या सहकार्याने मोठ्या उत्साहाने संपन्न झाला.
विद्यार्थ्यांना शाळेचे वातावरण माहीत व्हावे, शाळेबद्दल वाटणारी भीती कमी व्हावी म्हणून वाजत गाजत लेझीम च्या गजरात बैलगाडीतून इयत्ता पहिली च्या विद्यार्थ्यांची मिरवणूक काढण्यात आली. औक्षण करून पुष्पवर्षाव आत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले यानंतर कार्यक्रमाचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ शितल सोनवणे व खोरवडी गावचे उपसरपंच श्री दीपक सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले.
इयत्ता पहिली चा सर्व विद्यार्थ्यांना अभ्यास पुस्तिका ,फुगे, टोप्या ,खाऊ, चॉकलेट यांचे वाटप करण्यात आले सदर कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समिती ,सर्व शिक्षक वृंद ,ग्रामस्थ ,पालक, विद्यार्थी मित्र यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
Related
More Stories
500 कोटी जलसाठा टीम च्या वतीने नदी पात्राची सफाई,सायकलिंग ग्रुप च्या वतीने 76 हजाराचे योगदान…
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगाव(प्रतिनिधी)- शहरातील तितूर व डोंगरी नदी पत्र अरुंद झाल्यामुळे मागच्या वर्षी अतिवृष्टी झाल्यामुळे...
गावठी दारू सह 4 लाख 71 हजार 350 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त यवत पोलिसांची कामगिरी
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक यवत-दि 13 मे 2022 रोजी गावठी हातभटटी दारूची वाहतुक करणाऱ्याला अटक करत,चार लाख...
चाळीसगाव येथे मंगळग्रह मूर्तीची प्राणप्रतिष्ठा,14 मे रोजी महाप्रसादाचे आयोजन…
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगाव(प्रतिनिधी)-शहरातील गांधी चौक येथील महादेव मंदिराराजवळ आज दिनांक 13 रोजी मंगळग्रह मूर्तीची प्रतिष्ठापना...
जिल्हा रुग्णालयात कैद्यांची हाणामारी, 4 पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन…
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक जळगाव- जिल्हा रूग्णालयात कैद्यांच्या दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारी प्रकरणी पोलीस कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा कर्तव्यात कसूर...
धक्कादायक शहरात बोगस क्लीनिकल लॅब व पॅथॉलॉजीस्ट चा सुळसुळाट, आरोग्य यंत्रणा गप्प का?
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगांव(प्रतिनिधी)-कुठलाही छोटा-मोठा आजार असो, अनेकदा आजाराचे अचूक आणि योग्य निदान होण्यासाठी रुग्णांच्या विविध...
विविध क्षेत्रातील ४३ मान्यवरांचा आदिलशाह फारुकी बहुउद्देशीय संस्थेतर्फे डॉ एपीजे अब्दुल कलाम पुरस्काराने सन्मान
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक जळगांव-जळगाव जिल्ह्यातील अडावद येथील नामांकित "आदिलशाह फारुकी बहुउद्देशीय संस्थे" मार्फत रविवार ८ मे...
Average Rating