गांज्या तस्करांची महिती मिळताच पोलीस निरीक्षक नारायण पवार यांची झटपट कारवाई,आरोपींसहित78 लाखांच्या वर किंमतीचा मुद्देमाल जप्त

5 0
Read Time6 Minute, 0 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

यवत(वृत्तसेवा)- यवत पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांना दि 26 डिसेंबर 2021 रोजी गुप्त बातमीदारामार्फत पुणे हायवे रोडने दोन मालवाहतुक करणारे ट्रक हे आंध्रप्रदेश, कर्नाटक राज्यातुन पुणे येथे विक्रीसाठी गांजा घेवुन येणार असल्याची माहिती मिळताच तात्काळ दोन पथक तयार करत रात्री 1 वाजून 35 मिनिटांच्या सुमारास कारवाई करत 78 लाख 10 हजार 500 रुपयाच्या मुद्देमाल सहित आरोपी ताब्यात.

यवत पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक नारायण पवार,यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की,सोलापुर पुणे हायवे रोडने दोन मालवाहतुक करणारे ट्रक हे आंध्रप्रदेश, कर्नाटक राज्यातुन पुणे येथे विक्रीसाठी गांजा घेवुन येणार असल्याची माहीती मिळाली. सद मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी छापा घालणे कामी दोन पथक तयार करून सर्व कायदेशीर बाबी,पंच आदिची पुर्तता करून पहाटे ०१:३५ वाचु सुमारास पाटस गावापासुन काही अंतरावर
असलेले इंडीयन ऑईल पेट्रोलपंप व राजश्री व्हेज हॉटेलच्या विरुध्द बाजुस सोलापुर पुणे हायवे रोडच्या बाजुला असलेल्या सर्व्हिस रोडच्या कडेला सापळा लावुन ट्रक क १) ए.पी/१६ / टी.जी.२२५६ व २) ए.पी/०७/टी.एम.७७९९ असे दोन मालवाहतुक करणारे ट्रक ताब्यात घेवुन सदर दोन्ही गाडयांची
पंचासमक्ष झडती घेतली असता दोन्ही गाडयामध्ये आरोपीत यांनी ड्रायवर सीटच्या बाजुला एकुण ६ पिशव्यामध्ये वेगवेगळया बंद पाकीटात एकुण १६७.२५ किलोग्रॅम असा ३०,१०,५०० /- रु.(तीस लाख दहा हजार पाचशे रुपये ) किंमतीचा गांजा व गुन्हयात वापरते दोन मालवाहतुक ट्रक ४८,००,००० /-रु (अठठेचाळीस लाख रुपये) किंमत असा एकुण ७८, १०, ५०० रूपये ( अठठ्यात्तर लाख दहा हजार पाचशे रुपये ) किंमतींचा गुन्हयामध्ये मुददेमाल जप्त करुन पुरुष आरोपी नामे १)रविकुमार जागेश्वराव पुपल्ला रा झमिदागुमिल्ली वागुमिल्ली ता.जि.किष्णा राज्य आंध्रप्रदेश २)रवि कॉटया अजमेरा रा.विजयवाडा ता.कंखीपाट जि.कृष्णा राज्य आंध्रप्रदेश ३)उमेश खंडु थोरात रा.मंचर ता.आंबेगाव जि.पुणे ४)युवराज किसन पवार रा.मुथळा ता.मुथळा जि.बुलढाणा ५)उत्तम काळु चव्हाण रा.करवंड ता.चिखली जि.बुलढाणा ६)प्रकाश एन व्यंकेटेश्वराव रा. विजयवाडा ता.कृष्णा जि.कंळीवाळ राज्य आंध्रप्रदेश ७) किसन शालीमार
पवार रा.मुथळा ता.मुथळा जि.बुलढाणा व महिला आरोपी नामे १) रुक्मिणीबाई रुपराव पवार रा.ढाकरखेड ता.चिखली जि.बुलढाणा २)मिना युवराज पवार रा.ढाकरखेड ता.चिखली जि.बुलढाणा ३)ममता उत्तम चव्हाण रा.करवंड ता.चिखली जि.बुलढाणा ४) लालाबाई देवलाल चव्हाण रा.चिखली ता.चिखली जि. बुलढाणा ५)ललिता हिरालाल पवार रा. रा.ढाकरखेड ता.चिखली जि.बुलढाणा असे ७ पुरुष ५ महिला असे एकुण १२ आरोपी अटक केले आहेत. NDPS कायद्याअंतर्गत सर्व आरोपीतांवर गुन्हा दाखल केला आहे.
सदरची कामगिरी श्री डॉ अभिनव देशमुख सो.पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण, मा.अप्पर पोलीस अधिक्षक मिलींद मोहीते सो बारामती विभाग, मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.राहुल धस,यांचे मार्गदर्शनाखाली यवत पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री.नारायण पवार, स.पो.नि केशव वाबळे, पो.स.ई पदमराज गंपले, पो.ना.गणेश सोनवणे,पो.ना विशाल गजरे, पो.ना विकास कापरे, पो.हवा जे.एम.भोसले, पो.हवा.भानुदास बंडगर, पो.ना.रविंद्र गोसावी, पो.ना.मेघराज जगताप, पो.ना.महेंद्र चांदणे, पो.ना नुतन जाधव, पो.ना.प्रमोद गायकवाड, पो.शि.सुजित जगताप, पो.शि.दिपक यादव, पो.शि.
तात्याराम करे, पो.शि.गणेश मुटेकर, पो.शि. आनंद आहेर, म.पो.शि धावडे, चालक सहा.फौज.सत्यवान जगताप, पो.ना.विजय आवाळे, पोलीस मित्र रामा पवार,निखिल अवचट यांनी कारवाई केली आहे.सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक नारायण पवार हे करीत आहेत.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.