अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी सनी घावरी चिंचवड

काल दिनांक 15/08/2020 रोजी गुन्हे शाखा युनिट 2 ची टीम सह PSI निलपत्रेवार पोहवा स्वामी,वेताळ, नामदेव राऊत, पोना,जयवंत राऊत असे हद्दीत पेट्रोलींग करत आसताना नामदेव उर्फ देवा राऊत यांना गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की दोन सराईत चोर चोरीचा लॅपटॉप विकण्यासाठी पवळे ब्रीज येथे येणार आहेत अशी माहिती मिळताच तातडीने वरीष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड यांचे मार्गदर्शनखाली सदर ठिकाणी सापळा रचुन मिळाल्या माहितीनुसार आरोपी इसमास ताब्यात घेतले त्यांची अंगझडती घेतली व कसून चौकशी केली असता त्यांच्या कडे त्यांनी चोरलेला एक लॅपटॉप आढळून आला
त्यांनी खडक पोलीस स्टेशन च्या हद्दीत लॅपटॉपची चोरी केली असल्याचे कबुल केले त्यांना त्याचे नाव विचारले असता त्याने आपले नाव ) मंगेश विजय चव्हाण वय 23 वर्षे रा. वडारवाडी पुणे व ) महमद कलीम शेख वय 38 वर्षे रा. संत कबीर चौक नानापेठा पुणे असे सांगीतले त्यांची पूर्ण चौकशि केली असता ते सराईत गुन्हेगार असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले लॅपटॉप चोरीचा गुन्हा हा खडक पोलीस स्टेशन येथे नोंद असल्याचे निष्पन्न झाल्यावर व आरोपीनी गुन्हयाची कबुली दिल्याने आरोपीस रिपोर्टसह पुढील कार्यवाही साठी खडक पो.स्टे चे ताब्यात देण्यात आले आहे