Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

गोपाळवाडी येथील महिला सन्मान सप्ताहाची माँसाहेब जिजाऊ यांची जयंती साजरी करून कार्यक्रमाची सांगता

0
2 0
Read Time4 Minute, 0 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

उपसंपादक रोहित शिंदे

गोपाळवडी(प्रतिनिधी) – गोपाळवाडी गावचे तंटामुक्ती अध्यक्ष विठ्ठल होले यांच्या संकल्पनेतून 3 जानेवारी सावित्रीमाई फुले यांच्या जयंती पासून ते 12 जानेवारी मासाहेब जिजाऊ यांच्या जयंती पर्यंत गावातील गुणवंत विद्यार्थिनी तसेच कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सप्ताह सुरू केला होता त्याची माँसाहेब जिजाऊ यांच्या जयंतीच्या कार्यक्रमानंतर सांगता समारोप करण्यात आला.

3 जानेवारी— सरपंच सौ लक्ष्मी ताई होले शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात येईल.

4 जानेवारी –पोलीस पाटील सौ वर्षा ताई लोणकर

5 जानेवारी –माजी सरपंच सौ वैशाली ताई शिंदे

6 जानेवारी — माजी उपसरपंच सौ सिमा ताई बोरावके

7 जानेवारी — सदस्य सौ स्वाती ताई पवार

8 जानेवारी — सदस्य सौ विजया ताई सूळ

9 जानेवारी —सदस्य मनिषा ताई होले

10 जानेवारी —सदस्य सौ निता ताई गिरमे

11जानेवारी –सदस्य सौ मनिषाताई भोसले

12 जानेवारी — सदस्य सौ रोहिणी ताई शिंदे,कृषी सहायक शीतल ताई जाधव,दीक्षित ताई यांचा सन्मान करण्यात आला


क्रांतीज्योती राष्ट्रमाता सावित्रीमाई फुले आणि राजमाता जिजाऊ भोसले यांच्या जयंतीनिमित्त गोपाळवाडी ग्रामपंचायत येथे 3 जानेवारी ते 12 जानेवारी या कालावधी मध्ये ग्रामपंचायत कार्यालयात महिला सन्मान सप्ताह साजरा करण्यात आला, या कार्यक्रमास सरपंच उपसरपंच सर्व सदस्य, ग्रामसेवक तसेच ग्रामस्थ या कार्यक्रमास उपस्थित होते, 12 जानेवारी माँसाहेब जिजाऊ यांच्या जयंती निमित्त मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले, यावेळी शर्वरी गिरमे, गार्गी शिंदे, वैष्णवी शिंदे, उपसरपंच सुरेश भुजबळ, सदस्य जयसिंग दरेकर, रोहन गारुडी,वैशाली शिंदे, वर्षा लोणकर, यांनी आपले मनोगत व्यक्त केले, महिला सन्मान सप्ताह सोहळ्याची संकल्पनेची सुरुवात केल्याबद्दल सर्व महिला व ग्रामस्थांच्या वतीने तंटामुक्ती अध्यक्ष विठ्ठल होले यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला, या कार्यक्रमाला भीमराव होले,सदस्य जयसिंग दरेकर,उपसरपंच सुरज भुजबळ, सदस्य रोहन गारुडी, शरद होले, प्रकाश गिरमे, बंटी शिंदे, शांताराम होले,अजय भोसले, नवनाथ माने,अनिल होले, कल्पेश लांडगे, वैशालीताई शिंदे, वर्षा ताई लोणकर, स्वातीताई पवार सीमाताई बोरावके, रोहिनीताई शिंदे, मनिषाताई भोसले,शितलताई जाधव, दीक्षित मॅडम इत्यादी मान्यवर उपस्थित होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठल होले यांनी केले तर आभार प्रदर्शन शांताराम होले यांनी केले.

Happy
Happy
100 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: