अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी विजय जाधव
दौंड (प्रतिनिधी ):महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष गौतम कांबळे आपला दोन दिवशीय मंत्रालयातील दौरा आटपून दौंड जिल्हा पुणे येथे येत असताना त्यांच्या गाडीला अपघात झाला .पुणे सोलापूर हायवेवर यवत सबस्टेशनजवळ गुरुवारी पहाटे हा अपघात झाला .सोबत त्यांचे पुतणे किशोर कांबळे होते .दोघेही सुखरूप आसून त्यांच्या गाडीचा टेरिंग रोड तुटल्यामुळे हा अपघात झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे .
महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाने आळंदी तालुका खेड जिल्हा पुणे येथे शिक्षण परिषद व शिक्षक मेळाव्याचे आयोजन केले आहे .या मेळाव्यासाठी येणाऱ्या मान्यवरांची व मंत्र्यांची भेट घेण्यासाठी ते मंगळवारी पहाटे मुंबईला गेले होते .या मेळाव्याचे उद्घाटक प्रदेश काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आहेत .या कार्यक्रमाला राज्यातील अनेक मंत्री उपस्थित राहणार असून शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा होणार आहे .