घराणेशाहीचा पराभव जनतेचा विजय-प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

0 0
Read Time2 Minute, 28 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

दिल्ली(वृत्तसेवा)-दि 10 मार्च रोजी दिल्ली भाजपाच्या मुख्य कार्यालयावर भाजपातर्फे आभार व अभिनंदन सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेत मंचावरून बोलताना भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भाजपाला मिळालेला विजय हा लोकतंत्रा चा विजय असून घराणेशाहीचा प्रभाव आहे असे सांगितले
संपूर्ण देशात भाजप कार्यकर्ते विजयोत्सव साजरा करत असून,भाजपाला चार राज्यांमध्ये मिळालेल्या विजयाबद्दल भाजपतर्फे आभार व अभिनंदन सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आभार व अभिनंदन सभेत बोलताना सांगितले आम्ही संपूर्ण प्रचार सभांमध्ये विकासाबद्दल बोललो आणि घराणेशाहीचा विरोध केला,घराणेशाही लोकतंत्रास घातक असल्याची चिंता देखील व्यक्त केली, कोणाशी वयक्तिक दुश्मनी नसून माझा विरोध घराणेशाही ला असल्याचे असून या विषयावर चर्चा होणे आवश्यक आहे,जनतेने विकासाचा मुद्दा समजत घराणेशाहीला विरोध म्हणून भाजपवर विश्वास ठेवत मतदान केले जनतेने भाजपवर विश्वास केल्यामुळे उत्तरप्रदेश, उत्तराखंड, गोवा या राज्यांमध्ये भाजपास स्पष्ट बहुमत मिळाले असून दणदणीत विजय झाला आहे.
भाजपाला मिळालेला जनतेचा आशीर्वाद येणाऱ्या काळातील विकासाची ध्येय धोरणांच्या जोरावर मिळाला असून एक ना एक दिवस असा येईल की जनता आपल्या देशात घराणेशाही सूर्यास्त करुनच राहणार असे ही सांगितले व देशाच्या जनतेने दिलेल्या प्रेमाबद्दल ऋणी असल्याचे देखील व्यक्त केले.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.