चाळीसगाव उपविभागीय अभियंता, बांधकाम उपविभाग ज्ञानेश्वर विसपुते यांच्यावर चारलाखांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक पथकाची कारवाई…

संपादक गफ्फार शेख(मलिक)
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने कोणीही त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी, किंवा न करण्यासाठी अथवा ते काम करून दिल्याचे मोबदल्यात लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,नाशिक येथे संपर्क साधावा
श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर पोलीस अधीक्षक लाच प्रतिबंधक विभाग परीक्षेत्र नाशिक
चाळीसगाव(प्रतिनिधी)-पैश्यांची हाव काही संपेना,शासनाचा पगार घेऊन सुद्धा पैश्यांपुढे हतबल झालेल्या अधिकाऱ्यांची संख्या वाढलेली असून लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अश्या लाचखोर अधिकाऱ्यांवर कारवाया करत ही संख्या कमी करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करीत आहे .त्याच प्रयत्नांना यश म्हणजे ज्ञानेश्वर पंढरीनाथ विसपुते ,वय 57 वर्षे, पद- उपविभागीय अभियंता, बांधकाम उपविभाग चाळीसगाव, वर्ग-1, ता.चाळीसगाव , जिल्हा- जळगाव यांना 4 लाखांची लाच घेताना नाशिक येथे दि 16 सप्टेंबर 2023 नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाकडून अटक करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की यातील तक्रारदार यांनी डॉ . शामा प्रसाद मुखर्जी रुरबन’ या शासकीय योजनेचा माध्यमातून, बांधकाम उपविभाग ,ता.चाळीसगाव जिल्हा परिषद, जळगाव अंतर्गत पातोंडा ता.चाळीसगाव येथे समूह परिसरात क्लस्टर विकसित करण्याचे काम घेतले होते.सदर कामाची 4 कोटी 82 लाख रुपये रक्कम काढून दिल्याचा मोबदल्यात तसेच कामाचे अतिरिक्त सुरक्षा अनामत रक्कम 35 लाख रुपये मिळवून देण्याचे मोबदल्यात उपविभागीय अभियंता विसपुते यांनी 5 लाखांची मागणी केली होती तडजोड अंती 4 लाख रुपये देण्याचे ठरले 4 लाख लाचेची रक्कम स्वीकारली म्हणून लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक यांनी अटक करत गुन्हा दाखल केला आहे.सदर कारवाई मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परीक्षेत्र,नाशिक,मा .श्री माधव रेड्डी अपर पोलिस अधिक्षक,ला प्र वि नाशिक परिक्षेत्र नाशिक, श्री. नरेंद्र पवार, वाचक, पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि. नाशिक.यांच्या मार्गदर्शनाखाली श्री स्वप्निल राजपूत पोलीस निरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक यांच्या नेतृत्वाखाली पो.ना.प्रभाकर गवळी,पो. ना. संदीप हांडगे,पो. ना. किरण धुळे ,पो. ना. अविनाश पवार
पो.ना.सुरेश चव्हाण यांच्या पथकाने केली आहे.
ही चाळीसगाव शहरातील अवघ्या काही महिन्यातील शासकीय अधिकाऱ्यावरील ही तिसरी कारवाई आहे यापूर्वी धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोन कारवाया केल्या आहे आणि आता नाशिक विभागाची ही कारवाई मात्र शासकीय कार्यालयांना शासकीय कार्यालयांना लागली भ्रष्टाचाराची कीड थांबेल की चौथी कारवाई होणार अशी सर्वत्र चर्चा सुरू आहे.