चाळीसगाव एस टी महामंडळाचा अजब कारभार विना मास्क प्रवाश्यांना दंड आणि कर्मचाऱ्यांना सूट…

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार मलिक

चाळीसगांव(प्रतिनिधी)- वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री अभिजित राऊत यांनी चाळीसगाव शहरात दोन दिवसांचा जनता कर्फ्यु लागू केला आहे या जनता कर्फ्युस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे

याचाच एक भाग म्हणून आज चाळीसगाव एस टी आगारात सुद्धा विना मास्क प्रवाश्यांना 100 रुपये प्रमाणे दंड आकारण्यात आला, शासन नियम न पाळणाऱ्या लोकांवर कारवाई झालीच पाहिजे पण शासन नियम नुसते प्रवाश्यांसाठीच आहे का? कारण चाळीसगाव एस टी आगारात कर्मचारी मात्र बिनधास्त विना मास्क फिरतांना दिसत होते या विना मास्क फिरणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई का नाही असा संतप्त सवाल प्रवाश्यांनी विचारला असता उडवा,उडवीची उत्तर दिलीत मात्र जर शासन नियम सर्वांसाठी सारखे आहेत तर या कर्मचाऱ्यांवर कारवाई का नाही आगर प्रमुख यांच्यावर कारवाई करतील का असा प्रश्न उपस्थित राहतो.