चाळीसगाव प्रतिनिधी –
चाळीसगाव शहरात पोलीस प्रशासनाच्या वतीने कोरोना विषाणू आजारासंदर्भात काळजी घेऊन रस्त्यावर फिरणाऱ्यावर कारवाई केली जात आहे तर मोटारसायकल चालकांना जवळपास हजार रुपये दंड देखील दिला जात आहे हे कायदा सुव्यवस्था च्या दृष्टीने योग्य असले तरी यात काहींवर कायद्याचा बडगा तर काहीना मोकळीक असा पवित्रा पोलीस प्रशासन घेत तर नाही असा प्रश्न चाळीसगाव कराना पडु लागला आहे . काही जण किराणा, औषधे, भाजीपाला घेण्यासाठी शहरात येतात ते देखील नियम आणि शिस्त पाळताना दिसत आहेत ,मात्र काही लोक सिमेचे उल्लंघन करून चाळीसगाव तालुक्यातुन बाहेर जावुन पुन्हा गावात बिनधास्त येत आहेत याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष दिसत असुन
चाळीसगाव तालुक्यातील सिमा बंद करून जिल्हाबंदी आदेशाची सक्त अमलबजावणी करण्याची मागणी चाळीसगाव भागाचे प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर यांच्या कडे रयत सेनेच्या वतीने दि १३ रोजी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे
चाळीसगाव शहरात एकही कोरोना बाधीत रुग्ण नाही ही सुदैवाची बाब आहे मात्र पोलीस प्रशासनाकडून एवढ्या कडक उपाययोजना केल्या जात होत्या मग मालेगाव येथे कोरोनाबाधिताच्या अंत्यविधी साठी चाळीसगाव येथून १ जण गेले व परत देखील आले मग जिल्ह्याच्या सीमा या फक्त कागदावरच बंद केल्या होत्या का असा प्रश्न निर्माण झाला आहे.
मालेगाव येथे कोरोना बाधीत व्यक्ती च्या अंत्यविधी ला गेलेल्या त्या ६ जणांना संशयित म्हणून तपासणी साठी जळगाव येथे पाठवण्यात आले असल्याने त्यांचा अहवाल येई पर्यंत चाळीसगाव करांचा श्वास थांबला असून एक प्रकारची दहशत निर्माण झाली आहे.
राज्य शासनाने जिल्ह्याच्या सिमा बंद करण्याचे आदेश दिले असताना जर जिल्ह्याच्या सीमा खुलेआम सुरू असतील तर शहरातील लोकांना लॉकडाउन करून काय उपयोग जर बाहेरील कोरोनाबाधीत व्यक्ती गावात येईल तर दुसऱ्याला कोरोनाची लागण होण्याची शक्यता असते शिवाय चाळीसगाव तालुक्यात बाहेर गावाहून अनेक कामगार, विद्यार्थी, ऊसतोड कामगार आले आहेत यांची तपासणी करून त्यांना होम कवारांटाइन करणे गरजेचे असताना तसे होताना दिसत नाही फक्त चाळीसगाव शहरात वाहनचालकांना दंडात्मक कारवाई केली जात आहे म्हणून वरील बाबींवर लक्ष केंद्रित करून तालुक्यातील सर्व सिमा २४ तास बंद कराव्यात अन्यथा चाळीसगाव तहसील कार्यालया समोर रयत सेना उग्र स्वरुपाचे आंदोलन पुकारेल याप्रसंगी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोलीस व तहसील प्रशासन जबाबदार राहणार असल्याचे चाळीसगाव प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर यांच्या कडे रयत सेनेच्या वतीने दि १३ रोजी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे . निवेदनाच्या प्रत मुख्यमंत्री,गृहमंत्री,पालकमंत्री,जिल्हाधिकारी,पोलीस अधीक्षक,आमदार चाळीसगाव,शहर पोलीस निरीक्षक चाळीसगाव यांना पाठविण्यात आल्या आहेत. निवेदनावर रयत सेना संस्थापक अध्यक्ष गणेश पवार,अमोल पवार,विशाल पवार,अमोल वडनेरे,अनिल पवार,रमेश पवार,सागर यादव,चेतन पवार,कमलेश पवार,ऋषिकेश पवार,प्रवीण पवार,दिपक इंगोले,दिलीप पवार,अजय सुरळकर ,स्पनिल वडनेरे अदि च्या सह्या आहेत
Read Time5 Minute, 11 Second