
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव (प्रतिनिधी) : चाळीसगाव तालुक्यातील खराडी शिवारात 19 मे 2025 रोजी मध्यरात्री बकऱी चोरीचा प्रकार उघडकीस आला . या प्रकरणात भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 303(2), 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी तिघा आरोपींना अटक केली आहे.
फिर्यादी नारायण बाळासाहेब तिकांडे (वय 46, रा. शिंदी, ता. चाळीसगाव) यांच्या शेतातील घराबाहेर बांधलेल्या बकऱ्या चोरट्यांनी चोरून नेत असताना बकऱ्यांच्या आवाजामुळे फिर्यादींची झोपमोड झाली. त्यांनी तत्काळ चोरट्यांचा पाठलाग केला असता, चोरट्यांनी हिरापूर (ता. चाळीसगाव) येथे आपली ग्रे रंगाची हुंडाई सँट्रो (क्र. MH01NA558) गाडी सोडून पळ काढला.ग्रामीण पोलिसांनी त्या गाडीची तपासणी केली असता, एकूण आठ बकऱ्या सापडल्या. यामध्ये फिर्यादींच्या तीन बकऱ्यांसह अन्य काही नागरिकांच्या बकऱ्यांचाही समावेश होता.
या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय वेरुळे यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक राहुलकुमार पवार,पो.उपनिरी.कुणाल चव्हाण, पो.उनिरी.राहुल राजपुत, सहा.पो.उपनिरी. युवराज नाईक, पो.हे.कॉ.रविंद्र रावते, पो.हे.कॉ.प्रविण संगेले, पो.हे.कॉ. नितीन सोनवणे,पो.हे.कॉ.संदीप पाटील, पो.हे.कॉ.अकरम बेग, पो.ना.भगवान माळी, पो.कॉ.सुनिल पाटील, पो.कॉ.प्रदीप पवार यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने केला. तपासादरम्यान आरोपींची ओळख पटवत शांतराम उर्फ जिभ्या सुकलाल गायकवाड (वय 29, रा. पिंपरखेड, ता. भडगाव), अमोल महादु मालचे (वय 22, रा. यशवंत नगर, भडगाव) आणि सुनिल बापु देवरे (वय 23, रा. लोणी सीम, ता. पारोळा) यांना अटक करण्यात आली.
अटकेनंतर या तिघा आरोपींनी चाळीसगावसह जळगाव, धुळे, मालेगाव, नंदुरबार व संभाजीनगर ग्रामीण भागातही बकऱी चोरीचे अनेक गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.यामागे मोठे रॅकेट असल्याचे दिसत असून तपासात आजुन काही उलगडे होण्याची शक्यात आहे, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक भगवान माळी करीत आहेत.