अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव(प्रतिनिधी)-: अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेच्या (AIOCD) देशव्यापी आंदोलनाला समर्थन देत चाळीसगाव मेडिसिन डिलर्स असोसिएशनतर्फे बुधवार, दि. २० मे २०२५ रोजी औषध विक्रेत्यांचा बंद पाळण्यात आला असून विविध मागण्यांचे निवेदन यावेळी तहसीलदारांना देण्यात आले.
आज शहरात सराव मेडिकल बंद ठेवत चाळीसगाव मेडिकल डीलर्स असोसिएशन पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार प्रशांत पाटील यांना निवेदन सादर केले. ऑनलाइन औषध विक्री, ई-पोर्टल आणि इंटरनेट फार्मसीमुळे पारंपरिक औषध विक्रेत्यांवर परिणाम होत असल्याचा मुद्दा निवेदनात मांडण्यात आला आहे.तसेच GSR 817(E) दिनांक २८ ऑगस्ट २०१८ आणि कोविड काळातील GSR 220(E) दिनांक २६ मार्च २०२० या अधिसूचनांविरोधातही संघटनेने नाराजी व्यक्त केली आहे.
संघटनेच्या म्हणण्यानुसार, यापूर्वी अनेक वेळा शासन व प्रशासनाकडे निवेदने देऊनही ठोस निर्णय न झाल्याने हा बंद पुकारण्यात आला आहे. महाराष्ट्रातील तसेच जिल्ह्यातील सर्व औषध विक्रेते या आंदोलनात सहभागी झाले असल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली.
तसेच बंद काळात नागरिकांना अत्यावश्यक औषध सेवा मिळावी यासाठी संघटनेने आपत्कालीन संपर्क क्रमांक जाहीर केले आहेत. गरज भासल्यास नागरिकांनी खालील क्रमांकांवर संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे.
या निवेदनावर अध्यक्ष संजय पाटील, सचिव रोशन गुळेचा यांच्यासह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
अत्यावश्यक असल्यास
श्री. संजय पाटील – ९८८१२६०२६०
श्री. विनोद जैन – ९८२३२३३५०५
श्री. संजय ब्राह्मणकर – ९५०९५२१२११
श्री. रोशन गुळेचा – ९०१११०८१०८
श्री. योगेश येवले – ८८३००४२६८०
