अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव(प्रतिनिधी)- राहता पोलिस ठाण्यात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल असलेला फरार आरोपी चाळीसगाव तालुक्यातील रहिवासी असल्याची माहिती राहता पोलिसांनी देताच शहर पोलिसांनी सापळा रचत आरोपीला अटक करत पुढील कारवाईसाठी राहता पोलिसांच्या ताब्यात दिले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,राहता पोलीस स्टेशन, जिल्हा अहिल्यानगर येथे दाखल असलेल्या गुन्हा रजिस्टर क्रमांक १६८/२०२६ मधील पॉक्सो
डीएनएस कलम ६४ (२) तसेच पॉक्सो कायद्यांतर्गत कलम ४, ६ व ८ अन्वये दाखल गुन्ह्यातील फरार आरोपी मयूर ईश्वर केदार (रा. खरजई, ता. चाळीसगाव, जि. जळगाव) येथे राहत असल्याची माहिती राहता पोलीस स्टेशन येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक संगीता गिरी यांनी चाळीसगाव शहर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक संदीप घुले यांना दिली मिळालेल्या माहितीच्या आधारे आणि गंभीर गुन्ह्याची दखल घे घुले यांनी तत्काळ पथक तयार करत खरजई रेल्वे गेट जवळ सापळा रचत आरोपीस दि १९ मे रोजी रात्री अंदाजे ९ वाजेच्या सुमारास अटक केली.
त्यानंतर आरोपीस राहता पोलीस स्टेशन येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक संगीता गिरी व त्यांच्या पथकाच्या ताब्यात देण्यात आले.
ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने केली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक संदीप घुले, पोलीस कॉन्स्टेबल पवन पाटील, विलास पवार व बाबासाहेब खरात यांचा समावेश होता.
