अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी गफ्फार शाह

चाळीसगाव – महाराष्ट्र राज्यातील नगरपरिषद, नगरपंचायत, नगरपालिका क्षेत्रात काम करणाऱ्या विविध कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी १७ ऑगस्ट रोजी एकदिवसीय संप करण्यात आला. यात चाळीसगाव नगरपरिषदेसह संपूर्ण राज्यभरात हा संप पुकारला गेला. यात महाराष्ट्र राज्य नगरपरिषद, नगरपंचायत, संवर्ग कर्मचारी संघटना, व संघर्ष समितीचे सदस्य सहभागी झाले होते.
चाळीसगाव नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी या आंदोलनार सहभाग नोंदवून सरकारला जागे करण्यासाठीच्या घोषणा देण्यात आल्यात. नगरपरिषद कर्मचारी यांच्या वर्षानुवर्षेच्या मागण्या प्रलंबित असून राज्य सरकार याबाबत कोणतीही दखल घेत नाही, तसेच मागणीबाबत गांर्भीय दाखवत नाही. नगरपरिषद कर्मचारी हा अत्यावश्यक सेवेतुन जनतेचे समाधान करत असतो यात आपत्ती, महापुर, साथीचे रोग, आगीचे तांडव वा सद्यस्थितीतील कोवीड १९ सारखा विषाणूजन्य आजार असो या ठिकाणी नगरपरिषद कर्मचारी स्व:तची पर्वा न करता उभा राहतो.
ज्या ज्या वेळी नगरपरिषद कर्मचाऱ्यांवर अशा पद्धतीची परिस्थीती उदभवते त्यावेळी शासनाकडून सातत्याने दुर्लक्ष केले जाते. तरी आजच्या आंदोलनातील उल्लेख केलेल्या मागणीचा विचार होऊन पुर्ण करण्यात याव्या अशा प्रकारची मागणी यावेळी आंदोलनात सहभागी सर्व संघटनेचे पदाधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वतीने करण्यात आली.
याप्रसंगी राज्य संघटना सदस्य तथा जिल्हाध्यक्ष दिनेश जाधव, रोजंदारी कर्मचारी कृती समिती सहसचिव प्रेमसिंग राजपूत, लिपिक भूषण लाटे, महेश शिंदे, कुणाल महाले, राहुल साळुंखे, विलास नेरपगार, संजय राजपूत, वसंत देशमुख, प्रवीण तोमर, जितेंद्र जाधव, नितीन सुर्यवंशी, सुमित सोनवणे, अरुण देशमुख, प्रसाद बाविस्कर, बापू कोळी, नामदेव तुपे, रुपेश देशमुख, पृथ्वीराज ठोके, कैलास नागणे, नाना कोष्टी, प्रेमा गुजराथी, अशोक देशमुख, दिपाली देशमुख, कलावती पवार, संध्या कोष्टी, यशोदा पवार यासह इतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते