अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगव(प्रतिनिधी)-भारताच्या घटना परिषदेने अथक परिश्रम घेऊन देशाची राज्यघटना २६ नोव्हेंबर १९४९ रोजी देशाला अर्पण केली. त्या घटनेला ७० वर्षे होत असून २६ नोव्हेंबर हा संविधान दिन उत्साहात साजरा करुन लोकशाही संपन्न करण्यासोबत संविधान दिन साजरा करुन लोकशाही, समता, स्वातंत्र्य, बंधुभाव ही मूल्ये जोपासत राष्ट्राची एकात्मता बळकट करावी, असे आवाहन मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी केले, ते आज नगरपरिषद कार्यालयात संविधान दिनाच्या औचित्यपर कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते यावेळी संविधान उद्देशिकाचे वाचन करण्यात येऊन शपथ घेण्यात आली
२६ जानेवारी १९५० पासून या घटनेची अंमलबजावणी सुरु झाली आणि देशामध्ये लोकशाही राज्यव्यवस्था उभी राहीली. त्याचे उत्तरदायित्व म्हणून २६ नोव्हेंबर हा दिवस देशभरात संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. संविधान दिन हा लोकोत्सव व्हावा म्हणून नगरपरिषद कार्यालयात मोठय़ा प्रमाणावर संविधान दिन साजरा करुन लोकशाही, समता, स्वातंत्र्य, बंधुभाव ही मूल्ये आणि राष्ट्राची एकात्मता बळकट करावी, असे आवाहन यावेळी मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी केले
यावेळी स्नेहा फडतरे, शुभांगी पाटील, विजय खरात, भूषण लाटे, प्रेमसिंग राजपूत, निळकंठ सूर्यवंशी, सचिन निकुंभ, प्रशांत सोनवणे, सतिश दाभाडे, विलास नेरपगार, महेश शिंदे, नितीन सुर्यवंशी, सुमित सोनवणे, किशोर देशमुख, तिलक राजपूत, संध्या कोष्टी, राणी सोनी, दिपाली देशमुख, यशोदा पवार, वसंत देशमुख, रवी जाधव आदी नगरपालिका कर्मचारी उपस्थित होतेत