चाळीसगाव नगरपालिका नाशिक विभागात तर सचिन निकुंभ नगरपालिकेत नंबर वन…

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख(मलिक)
चाळीसगाव(प्रतिनिधी) – मानवाची निसर्गाशी असलेली कटिबद्धता निश्चित करण्यासाठी तसेच पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या पंचतत्त्वावर आधारित उपाययोजना करून निसर्गपूरक जीवनपद्धतीचा अवलंब करण्यासाठी १ एप्रिल २०२२ ते १ मार्च २३ पर्यंत ‘माझी वसुंधरा अभियान’ ३.० राबवण्यात आला आहे.या अंतर्गत नर्सरीची निर्मिती करणे, हिरवेगार क्षेत्र तयार करणे, पावसाचे पाणी जमिनीत मुरवणे, पाण्याचे नियोजन करणे, अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वापर, हवेची गुणवत्ता राखणे, आदी पर्यावरणपूरक कामे केली जातात. ही कामे उत्कृष्ट पद्धतीने केल्यामुळे चाळीसगाव नगरपालिका नाशिक विभागात अव्वल ठरली आहे.यासाठी अधिकारी व कर्मचारी वर्गाने मेहनत नक्की घेतली असेल पण याचे खरे मानकरी आहेत आरोग्य निरीक्षक सचिन निकुंभ त्यांचे कार्य,ध्येय आणि वृक्ष लागवड करत वाचविण्यासाठी केलेले अथक परिश्रम व नागरिकांमध्ये केलेली जनजागृती यामुळे त्यांचा सन्मानचिन्ह देत मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे यांनी चाळीसगाव नगरपालिकेच्या वतीने सन्मान केला आहे.
‘माझी वसुंधरा’ ३.० अभियानात ४११ स्थानिक नागरी स्वराज्य संस्थांनी सहभाग घेतला होता. यात चाळीसगाव नगरपालिकेच्या वतीने मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड तसेच हरित क्षेत्राचा विकास आणि विविध बाबी उत्कृष्टपणे राबवल्या. यात चाळीसगाव नगरपालिका महाराष्ट्र ८ व्या क्रमांकावर तर नाशिक विभागात प्रथम क्रमांक मिळवत बाजी मारून प्रथम क्रमांकाचे बक्षीस दीड कोटी पटकावले.नक्कीच यात चाळीसगाव नगरपालिका मुख्याधिकारी यांचे उत्तम मार्गदर्शन कर्मचाऱ्यांना लाभले मात्र विशेष व उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल आरोग्य निरीक्षक सचिन निकुंभ यांचे देखील कौतुक होणे गरजेचे आहे निकुंभ यांनी नुसतं वृक्षारोपणच केले नाही तर वृक्ष जगविण्यासाठी देखील शहरातील नागरिकांचा या कार्यात सहभागी करून वृक्ष जनजागृती करत वृक्ष जगविण्यासाठी जबाबदारी देत हा माझी वसुंधरा अभियान ३.० यशस्वी करून दाखविली त्यांनी केलेल्या कार्याची पावती म्हणून मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देत आरोग्य निरीक्षक सचिन निकुंभ यांचा सन्मान करण्यात आला आहे.निकुंभ यांच्या कार्याचे शहरातील विविध सामाजिक व राजकीय स्थरातून मान्यवरांकडून कौतुक होत आहे.