अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
चाळीसगाव शहरात पुन्हा सापडला पॉसिटीव्ह रुग्ण शहरातील जहागीरदार वाडी येथील डॉक्टर यांना बर वाटत नसल्याने नाशिक येथे उपचारासाठी गेले असता नाशिक येथे त्यांची कोरोना चाचणी केली असता आज त्या चाचणी चा रिपोर्ट पॉसिटीव्ह आल्याने पुन्हा चाळीसगावात धाकधूक वाढली आहे चालीसगावकरांनी काळजी घेण्याची गरज
माहिती मिळताच प्रांताधिकारी लक्ष्मीकांत सताळकर,तहसीलदार अमोल मोरे,वैद्यकीय अधिकारी डॉ डी के लांडे यांनी पॉसिटीव्ह आलेल्या रुग्णाच्या परिसराची पाहणी केली व संपर्कात आलेल्या चार जणांना क्वारनटाइन केले व त्यांचे कोरोना चाचणीचे नमुने घेऊन तपासणी साठी पाठविणार असल्याचे सांगितले
पॉसिटीव्ह रुग्णाची माहिती कळताच नगरसेवक बंटी ठाकूर,नगर सेविका सविता ताई राजपूत,ज्येष्ट पत्रकार सुनील राजपूत,गणेश पाटील आपले कर्तव्य यांनी परिसरात जाऊन नगरपालिका कर्मचाऱ्यांना सूचना देत जंतुनाशक फवारणी करू घेतली